आ. वैभव नाईक, संग्राम प्रभुगावकर, नागेंद्र परब यांनी केले मार्गदर्शन
वेताळ बांबर्डे जिल्हा परिषद मतदारसंघात कडावल येथे शिवसेना सदस्य नोंदणी अभियान कार्यक्रम आज पार पडला. कुडाळ तालुक्यात शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा आजचा दुसरा दिवस असून कडावल येथून याची सुरुवात करण्यात आली. यावेळी शिवसेना सदस्य नोंदणी अभियान यशस्वी करण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने जोमाने काम करावे. घराघरात शिवसेना सदस्य होण्याच्या दृष्टीने कामाला लागा. जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करून पक्ष संघटना मजबूत करावी. याबाबत आमदार वैभव नाईक, कुडाळ निरीक्षक संग्राम प्रभुगावकर, जि. प. गटनेते नागेंद्र परब यांनी मार्गदर्शन केले.तसेच ठाकरे सरकारच्या माध्यमातून वर्षभरात झालेल्या विकास कामांबाबत माहिती देण्यात आली.
याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, तालुका प्रमुख राजन नाईक,तालुका संघटक बबन बोभाटे,उपसभापती जयभारत पालव, विभागप्रमुख पप्पू पालव, उप विभागप्रमुख नरेंद्र राणे, मंगेश मर्गज, पं. स. सदस्या शीतल कल्याणकर, तालुका महिला संघटक स्नेहा दळवी, आवळेगाव सरपंच सुनील सावंत,कडावल उपसरपंच विद्याधर मुंज, संदीप सावंत, आनंद मार्गज, सोशल मीडिया जिल्हाप्रमुख अनुराग सावंत, युवासेनेचे संकेत सावंत, शाखा प्रमुख रामदास मेस्त्री, सुहास तेरसे, विजय सावंत, लालू सावंत, बाळा कुंभार, रुपेश सावंत, समेश गावकर, चंद्रकांत सावंत, दिलीप सावंत, बाजीराव झेंडे, गुरुनाथ मुंज आदींसह वेताळ बांबर्डे जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसेना युवासेना महिला आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.