You are currently viewing वेंगुर्ला तालुक्यात ३० हजार सभासद नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करू

वेंगुर्ला तालुक्यात ३० हजार सभासद नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करू

वेंगुर्ला येथे आयोजित सभासद नोंदणी कार्यक्रमात पक्षनिरीक्षक तथा शिवसेना नेते संदेश पारकर यांनी व्यक्त केला विश्वास.

वेंगुर्ले
वेंगुर्ले तालुक्यातील प्रत्येक गावागावात घराघरात शिवसेनेचे विचार, बाळासाहेबांचे विचार आणि उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद आणि त्यांची कामगिरी प्रत्येक माणसात बिंबाविणार आहेत, सर्वसामान्य माणसाच्या मनातील विकास करायचा असेल तर शिवसेनेशिवाय पर्याय नाही आणि त्यासाठी या १५ दिवसात घराघरात जाऊन शिवसेना सभासद नोंदणी करणार आहोत, सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ लाख पेक्षा जास्त सभासद नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करू आणि वेंगुर्ला तालुक्यात २५ ते ३० हजार सभासद नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करू असा विश्वास वेंगुर्ला पक्षनिरीक्षक तथा शिवसेना नेते संदेश पारकर यांनी वेंगुर्ले येथे आयोजित सभासद नोंदणी कार्यक्रमावेळी व्यक्त केला. या वेळी पुढे पारकर म्हणले की जिल्ह्यात सभासद नोंदणी मध्ये वेंगुर्ले तालुका प्रथम क्रमांकावर असेल. प्रत्येक गावात, पंचायत समिती मतदारसंघात, जिल्हा परिषद मतदान संघात आणि प्रत्येक नगरसेवकांच्या वॉर्डमध्ये सभासद नोंदणी होणार आहे. आणि या पंधरा दिवसांमध्ये भगवा सप्ताह निर्माण करण्याचा मानस आहे. बेसिक शिवसेना, युवासेना, महिला आघाडी या सर्वांना सोबत घेऊन सभासद नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करणार आहोत असे प्रतिपादन संदेश पारकर यांनी केले.

या सभासद नोंदणी कार्यक्रमास माजी आमदार शंकर कांबळी यांनी मार्गदर्शन केले, यावेळी ते बोलत होते की १९८७ मध्ये बाळासाहेबांनी आदेश दिले की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भगवा सप्ताह चालू झाला पाहिजे आणि नोंदणी झाली पाहिजे त्यावेळी देखील माझा पहिला नंबर होता आणि त्यावेळेपासून शिवसेनेबद्दल जो आदर आणि अभिमान आहे तो कायम हृदयाशी ठेवून वाटचाल करत होतो आणि यापुढेही करणार. सभासद नोंदणी मध्ये वेंगुर्ला तालुक्याची टक्केवारी जास्त असेल असा प्रयत्न आम्ही सर्व मिळून करणार असे प्रतिपादन माजी आमदार शंकर कांबळे यांनी केले. या सभासद नोंदणीमध्ये शंकर कांबळी यांचा प्रथम सभासद नोंदणी अर्ज भरून सुरुवात करण्यात आली, यात प्रणाली बंगे, सुकन्या नरसुले, अनुश्री कांबळी, अस्मिता राऊळ, काशिनाथ नार्वेकर, मनोहर येरम, नितीन मांजरेकर, नीलेश चमणकर, श्रद्धा गावडे, स्वरूपा गावडे, सीमा गावडे, अपेक्षा बागायतकर, सायली आडारकर, सुमन निकम, सायली पोखरकर आदि सभासदांचे अर्ज भरण्यात आले.

या सभासद नोंदणी कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक व वेंगुर्ला तालुका पक्ष निरीक्षक संदेश पारकर, माजी आमदार शंकर कांबळी, महाराष्ट्र हिंदू कामगार सेनेचे रत्नागिरी सिंधुदुर्ग सहसंपर्कप्रमुख आप्पा पराडकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा आघाडी प्रमुख जानवी सावंत, अवधुत मालणकर, उपजिल्हाप्रमुख बाळा दळवी, सचिन देसाई, आबा कोंडसकर, सुकन्या नरसुले, वेंगुर्ला तालुकाप्रमुख यशवंत परब, पंचायत समिती सभापती अनुश्री कांबळी, उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, नगरसेवक संदेश निकम, पंचायत समिती सदस्य सुनील मोरजकर, सचिन वालावलकर, शहर प्रमुख अजित राऊळ, मंजुषा आरोलकर, प्रणाली बंगे, काशीनाथ नार्वेकर, मनोहर येरम, पंकज शिरसाट, विवेक आरोलकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − 9 =