You are currently viewing भगवा डौलानं फडकला; युवा रक्तदाता संघटनेचा पुढाकार

भगवा डौलानं फडकला; युवा रक्तदाता संघटनेचा पुढाकार

सावंतवाडी
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार कायम ज्वलंत ठेवणारे, हिंदुत्त्वाच प्रतिक असणारे भगवे झेंडे शहरातील चौकाचौकात उभारण्यात आले होता. गेली अनेक वर्षे हे झेंडे चौकाचौकात डौलानं फडकत असलेले पाहायला मिळायच.मात्र, या भगव्याकडे झालेल दुर्लक्ष लक्षात घेऊन युवा रक्तदाता संघटना पुढे सरसावली. संघटनेच्या माध्यमातून शहरातील चौकाचौकातील हे भगवे झेंडे डौलानं फडकवण्यात आले. यावेळी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी,जोसेफ आल्मेडा, मेहर पडते,आर्चित पोकळे, प्रथमेश प्रभु,प्रतिक बांदेकर,मॅलवीन डिसोझा,शब्बीर मणियार,नितिन कारेकर, शुभम बिद्रे, हृषिकेश सुर्याजी आदी उपस्थित होते.‌

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 − two =