“एस.टी.प्रशासनाने मालवाहतुकीचे योग्य नियोजन करावे.”

“एस.टी.प्रशासनाने मालवाहतुकीचे योग्य नियोजन करावे.”

महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेची मागणी.

कुडाळ प्रतिनिधी

कोरोना लाँकडाऊन मुळे आर्थिक संकटात असलेल्या एस.टी.ला बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेने मागणी केल्यानुसार,एस.टी.ची. मालवाहक सेवा सुरु झालेली असुन महाराष्ट्रातील काही भागांमध्ये भरघोस ऊत्पन्नही मिळत आहे. मात्र औद्योगिक क्षेत्र नसलेल्या भागात मालवाहतुकीला प्रतिसाद मिळत नसल्याने, मालवाहतुक करणार्‍या चालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. एस.टी.ची मालवाहतुक ही शासनाच्या ११ विभागांना जोडून मालवाहतुकीचे नियोजन करण्याबाबत म.न.रा.प.का.सेनेने यापुर्वीच
सुचना वजा विनंती राज्यशासनाकडे व एस.टी.चे परिवहन मंत्री मा.अनिल परब यांचेकडे केली आहे. त्याबाबत प्रस्ताव तयार झाला असुन त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही.
त्यामुळे मालवाहतुक करीता एस.टी.चे अधिकारी यांना शोधाशोध करावी लागत आहे.काही भागात माल घेऊन जातांनाची वाहतुक मिळत आहे मात्र परतीची वाहतुक मिळत नसल्याने त्यावर कामगिरी करणार्‍या चालकांना आपल्या विभागापासुन दुर असलेल्या स्थळी अडकून रहावे लागत आहे त्यांना राहण्याची जेवणाची सोय नसुन त्यांच्याकडील पैसे संपतात कोरोनामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असुन मालवाहतुक चालकांनी या सर्व समस्या मांडल्यास.संमधित बरेच आगारप्रमुख मालवाहक चालकांकडे लक्ष न देता त्यांना ऊडवाऊडवीची ऊत्तरे देत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत, यावरुन बर्‍याच आगारप्रमुखांना मालवाहतुक डोकेदुखी वाटत असुन ती बंद पडण्याकरीताच हा प्रकार चालल्याचा प्रश्न निर्माण होत आहे?मालवाहतुक चालकांनी समस्या मांडल्यास कार्यवाही करण्याचा दबाव टाकत असल्याचे नुकत्याच व्हाँट्स अँप वर प्रसारीत झालेल्या व्हीडीओ क्लिप मध्ये मालवाहतुक करणार्‍या चालकांनी आपल्या समस्या प्रसारीत केल्या आहेत. ही बाब अत्यंत गंभिर असुन याबाबत एस.टी.प्रशासनाने योग्य नियोजन करावे.व शासनाचे माल वाहतुक करणारे विभाग एस.टी.मालवाहतुकीला तात्काळ जोडण्यात येऊन मालवाहतुकीसाठीची भटकंती थांबवावी व मालवाहतुक चालकांवरील अन्यायकारक प्रकार न थांबल्यास महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेला विरोधात्मक पाऊल ऊचलावे लागेल असा इशारा एस.टी.प्रशासनास म.न.रा.प.का.सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष हरी माळी महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रदिप गायकी यांनी दिला असुन यावर निर्णय न झाल्यास त्याचे परिणाम गंभिर होतील अशी माहीती
म.न.रा.प.का.से. उपाध्यक्ष, महाराष्ट्र, जे.डी. उर्फ बनी नाडकर्णी यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा