ही*जागतिक साहित्य कला विकास मंचच्या सन्माननीय सदस्य लेखिका कवयित्री अंजली पंडित दीक्षित लिखित अप्रतिम लेख*
नवरात्र_उद्याची पहाट*
या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थित:
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः
हे आदिशक्ती आदीमाये विद्येची देवी सरस्वती तू ज्ञान बुद्धी आणि चेतनेच्या रूपाने सर्व प्राणीमात्रांमध्ये तसेच सर्व व्याप्त आहेस. माझा तुला पुन्हा पुन्हा दंडवत, पुन्हा पुन्हा मी नतमस्तक, पुन्हा पुन्हा माझा नमस्कार अशा अर्थाने पूजा अर्चना करत नऊ दिवस नऊ रात्री आपण विद्यारूपिणी आदीमायेला वंदन करतो. देवीच्या प्रसन्न, मधुर, प्रेमळ, चंडिका आणि जाज्वल्य स्वरूपाचे स्मरण, आळवणी करून तिच्या कृपाप्रसादाचे ऋणी होऊ इच्छितो. नवरात्रीच्या या नऊ दिवसात तना मनात एक प्रकारची ऊर्जा प्रवाहित होते जी पुढे वर्षभर आपल्याला शक्ती प्रदान करते.
अशा पूजा अर्चना आपल्या संस्कृतीमध्ये खूप पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत. त्यांची स्वतःची अशी एक वेगळी परंपरा आहे. घराघरांमध्ये घटस्थापना होते. नऊ दिवस माळा, नैवेद्य, आरती, नंदादीप या सर्वांनी वातावरण अगदी भक्तीमय होते. त्या निमित्ताने संपूर्ण घराची स्वच्छता पण होते आणि आरोग्य चांगले राहते. हे सगळं मान्य आहे. पण प्रामाणिकपणे विचार केला तर या नऊ दिवसात असो किंवा या नवरात्रानंतर म्हणूया ज्या देवी स्वरूपाची आपण मनोभावे पूजा केली ती स्त्री खरंच आपण आदरस्थानी मानतो का? याचा कधी विचार केला का? आजूबाजूला हेच घडताना दिसते आहे की विकृत मनोवृत्तीचा पहिला बळी स्त्रीचअसते. मग ते एकतर्फी प्रेमातून तिच्यावरचा भ्याड ऍसिड हल्ला असो, भर रस्त्यात मुलीवर केलेला चाकू हल्ला असो किंवा तिला परदेशात नेऊन तिची विक्री करणे असो. अतिशय घृणास्पद अशा ऍसिड हल्ल्याला बळी पडलेल्या मुली त्याचे महाभयंकर परिणाम अंगा खांद्यावर वागवत कसा जन्म काढत असतील याचा कधी विचार केलाय का? मणिपूर सारख्या घटनांमध्ये स्त्रीला प्यादं बनवून राजकीय पटलावर पोळी भाजली जाते; त्याचा आपण पुढे होऊन निषेध केला का? भाजीसारखे तिच्या शरीराचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले जातात आणि कित्येक महिने कुणाला खबरही लागत नाही; या आणि अशा कितीतरी गोष्टी समाजात घडत आल्यात आणि अजूनही राजरोसपणे घडतच आहेत. पण तोंडावर पांढरपेशा म्हणून बुरखा पांघरून बसलेला आपला ढोंगी समाज पेटून उठलेला बघितलाय का कधी? तेवढ्यापुरते मेणबत्ती घेऊन मोर्चे काढले जातीलही पण पुढे काय? न्याय मिळतो का त्या स्त्रीला?
पण इथे मूळ प्रश्न आहे न्याय देणार कोण? ती समाजव्यवस्था काय न्याय देणार जिने सुरुवातीपासूनच स्त्री आणि पुरुषांमध्ये असमानतेची बीजे पेरली आहेत. आता हेच बघा ना, आपण शाळेत प्रवेश घेतला की धड्यामध्ये काय शिकतो
अमर अंबा खा, राधा पाणी भर
गगन झाडावर चढ ,सीता केर काढ
छगन अभ्यास कर, गीता डबा उघड.
ही सुरुवातीची बाळबोध वाटणारी वाक्य आपल्या मनावर स्त्री आणि पुरुषांमधल्या कामाची किंवा दर्जाची विभागणी दर्शवत नाहीत काय? कोवळ्या वयातच मेंदूमध्ये स्त्रीला दुय्यम वागणूक द्यायची बीजे पेरली गेली तर त्याचं समानतेच्या वृक्षात रूपांतर होण्याची शक्यता किती टक्के उरेल? आता हेही बघा की तुमच्या परिचितांमध्ये कोणा मुलाचा वाढदिवस आहे. तो मुलाचा असेल तर तुम्ही गाडी किंवा बॅट बॉल वगैरे खेळ भेट म्हणून देता. तोच वाढदिवस मुलीचा असेल तर तिला हमखास बाहुली किंवा नटण्याचं सामान वगैरे भेट देता. हा आपल्या दृष्टिकोनातला फरक नकळतपणे तुम्ही पुढच्या पिढ्यांवर लादता की नाही? म्हणजे मुलींनी बाहुलीशी खेळावं नटावं मुरडावं आणि मुलांनी गाडी बॅट बॉल खेळावा… हे कुणी ठरवलं? विद्येच्या देवीची आपण आराधना करतो ना मग द्या ना दोघांनाही गोष्टीची छान छान पुस्तकं भेट. थोरा मोठ्यांची चरित्रही भेट देऊ शकतो, चित्रकलेचे साहित्य भेट देऊ शकतो.
गरज आहे दृष्टिकोन बदलायची.
आज मुलांची हिंमत इतकी वाढायचं कारण त्यांच्यावरचे चांगले संस्कार कमी पडतात असाच होतो ना? घरातून आणि शाळेतूनही त्यांना हे सांगितले गेले का की मुलींचा आदर ठेवणं त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणं ही तुझी सामाजिक जबाबदारी आहे. बरं आहेत तुमचे मुलगे चांगले पण बाहेर पडल्यावर तुमची बहीण किंवा आईसुद्धा सुखरुप परत येईल याची १००% खात्री राहिली आहे का? मग हे समाजभान यायला अजून किती निर्भयांचा बळी द्यावा लागणार आहे.
ही असमानतेची विषवल्ली वाढत जाते आणि स्त्रीही स्वतःला दुय्यम दर्जाचीच समजू लागते. कुठलाही निर्णय घेताना स्वतंत्रपणे स्वतःच्या जबाबदारीवर तो घेऊन त्याच्या भल्याबुऱ्या परिणामांना सामोरे जाण्याची तिची कूवत ती पूर्णपणे वापरत नाही. सतत कुणाचा तरी आधार शोधण्यातच तिला सुरक्षित वाटू लागते. आता काळ बदललाय तसं हे चित्र बदलायला सुरुवात झाली आहे असं वाटतंय पण हे म्हणणं धाडसाचे ठरू शकते. कारण हा बदल किती टक्के आहे तेही बघावं लागेल. बदल झालाय असं म्हणणाऱ्यांनी मग स्त्रियांवर अजून अत्याचार का होतोय, त्या शंभर टक्के सुरक्षित का नाहीत याची उत्तर पण द्यावीत. फक्त सामाजिकच नाही तर ऑफिसच्या ठिकाणी सुद्धा आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या देखील सर्वाधिक बळी महिलाच ठरत आहेत. महिलांसाठी राखीव जागा असो, त्यांच्या बाजूने कायदे असो, त्यांच्या सुरक्षेसाठी लागणारी यंत्रणा सुद्धा सक्षम असू दे पण तरीही रोज शेकड्याने स्त्री अत्याचाराला बळी पडते आहे. आज खरी वंचित जात कुठली म्हणावी? तर ती स्त्रीची आहे असं खेदानं म्हणावंसं वाटतं. ज्या दुर्गेची, तिच्या शक्तीस्वरूपाची आपण पूजा करतो त्या स्त्रीला आदराचं समानतेचं स्थान मिळेल तेव्हाच खऱ्या अर्थानं हा ‘उत्सव’ ठरेल यात शंका नाही. ही नवरात्र फक्त नऊ दिवसांपुरती न राहता तिच्यात दडलेली उद्याची मंगलमय पहाट लवकरच येवो, हेच त्या जग्गज्जननी आदीमायेपाशी आमचं मागणं.
अंजली दीक्षित-पंडित
छत्रपती संभाजीनगर
९८३४६७९५९६
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*