You are currently viewing चौकुळ येथे महिलेचा ओहोळात पडून मृत्यू

चौकुळ येथे महिलेचा ओहोळात पडून मृत्यू

चौकुळ येथे महिलेचा ओहोळात पडून मृत्यू

आंबोली

चौकुळ सातेरी मंदिरामागील ओहोळात कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेचा पाय घसरून पडून बूडून मृत्यू झाल्याची घटना चौकुळ सातेरी मंदिर परिसरात काल दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. उदयकला भिकाजी गावडे (६२, रा. चौकुळ खालचीवाडी) असे त्या महिलेचे नाव आहे. शनिवारी प्रथमच ती त्या ठिकाणी कपडे धुण्यासाठी गेली होती.गतवर्षी माकडाने केलेल्या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली होती. परंतु ती सुदैवानेच वाचली होती. परंतु शनिवारी तिला काळानेच ओढून नेले. शनिवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास मंदिरामागील ओहोळात कपडे धुण्यासाठी ती गेली होती. दररोज ती ज्या ठिकाणी कपडे धुण्यास जात होती, त्या ठिकाणी पाणी कमी झाल्याने ती शनिवारी सकाळी या ओहोळावर कपडे धुण्यास गेली होती. कपडे धुवत असताना तोल जाऊन अविवाहीत उदयकला गावडे  ही पाण्यात पडली. ती दुपारपर्यंत न आल्याने शोधाशोध सुरू झाली. त्यानंतर तिचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. याबाबतची माहिती चौकुळ पोलीस पाटील परशु गावडे यांनी आंबोली पोलिसांत दिली. आंबोली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जगदीश दुधवडकर, हवालदार दत्तात्रय देसाई, दीपक शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. मृत उदयकला यांचे भाऊ प्रदीप गावडे यांना घटनेची माहिती देण्यात आली.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा