You are currently viewing पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा वेंगुर्ले च्या वतीने विवीध सेवा कार्य आयोजित करुन ” सेवा पंधरवडा ” साजरा करणार

पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा वेंगुर्ले च्या वतीने विवीध सेवा कार्य आयोजित करुन ” सेवा पंधरवडा ” साजरा करणार

*उभादांडा – नवाबाग सागरकिनारा स्वच्छता अभियान राबवुन सेवा पंधरवड्याचा शुभारंभ…….*

भाजपा वेंगुर्ले च्या वतीने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा चे नियोजनाची बैठक प्रदेश कार्यकारणी सदस्य शरदजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका कार्यालयात संपन्न झाली .
यावेळी सेवा पंधरवडा – जिल्हा संयोजक प्रसंन्ना देसाई यांनी प्रदेश भाजपा ने दिलेली १७ सेवाकार्य कशा पद्धतीने करावी याबाबत मार्गदर्शन केले . तसेच प्रत्येक सेवा कार्याला संयोजक व सहसंयोजक नियुक्त करून तालुक्यातील लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांना जबाबदारी देण्यात आली .
यावेळी रक्तदान शिबिर , आरोग्य शिबीर व कोवीड लसीकरण ,कृत्रिम अवयव वितरण , वयोश्री योजनांचे कॅम्प , बुद्धीजीवी संमेलन , व्होकल फाॅर लोकल , स्वच्छ भारत अभियान , जल ही जिवन , वृक्षारोपण , तलाव स्वच्छ करणे , प्लॅस्टिक मुक्ती अभियान , आत्मनिर्भर भारत , एक भारत श्रेष्ठ भारत इत्यादी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले .
२ऑक्टोबर – गांधी जयंती निमित्त स्वदेशी , खादी , स्वावलंबन , साधेपणा आणि स्वच्छता याबाबत जनजागृती अभियान राबविण्यात येणार असुन , खादीचा प्रसार होण्यासाठी खादीचे कपडे जास्तीत जास्त नागरीकांनी खरेदी करावे यासाठी जनजागृती अभियान राबविण्याचे नियोजन केले .
यावेळी तालुकाध्यक्ष सुहास गवडंळकर , नगराध्यक्ष राजन गीरप , जिल्हा उपाध्यक्ष अॅड सुषमा खानोलकर , महिला तालुकाध्यक्षा स्मिता दामले , जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक व वसंत तांडेल व बाळा सावंत , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर , नगरसेवक प्रशांत आपटे , नगरसेविका श्रेया मयेकर व ईशा मोंडकर , ता.चिटणीस समीर चिंदरकर व समीर कुडाळकर , ता.उपाध्यक्ष दिपक नाईक , महिला मोर्चाच्या वृंदा मोर्डेकर व रसीका मठकर , युवा मोर्चाचे नारायण कुंभार व पींटू सावंत , शिरोडा सरपंच मनोज उगवेकर , आरवली सरपंच तातोबा कुडव , *शक्ती केंद्र प्रमुख* – संतोष शेटकर , महादेव नाईक , सुधीर गावडे , सतीश धानजी , गणेश गावडे , ताता मेस्त्री . खानोली उपसरपंच सुभाष खानोलकर , सांस्कृतिक आघाडीचे शैलेश जामदार , अल्पसंख्याक सेलचे रफीक शेख , किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस बाळु प्रभु व ज्ञानेश्वर केळजी , *बुथप्रमुख* – रविंद्र शिरसाठ , शेखर काणेकर , विनय गोरे , दादा तांडेल , सुनील घाग , गुरुनाथ घाडी , दादा सावळ , पुंडलिक हळदणकर , सत्यवान पालव , उदय गावडे , सत्यवान परब , नारायण गावडे , शशी करंगुटकर तसेच तालुक्यातील बरेच पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 + 1 =