सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या कष्टातून, त्यांच्या घामातून उभी राहिली असल्याचे मत जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांनी सावंतवाडी येथे पत्रकारांशी संवाद साधताना मांडले आहे. बँकेच्या अध्यक्षपदी काम करत असताना चांगले काम केल्याने विविध स्तरातून आपले सत्कार झाले आहेत. आपल्यावर होत असलेले आरोप हे होऊ घातलेल्या जिल्हा बँक निवडणुकीमुळे होत असून यापूर्वी असे आरोप कधी होत नव्हते तसेच माझ्यावर होणारे आरोप हे आमदार नितेश राणे यांचा कट असून, जनतेने हे आरोप का होत आहेत हे जनतेनेच समजून जावे असे देखील ते म्हणाले आहेत. जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होऊ नये यासाठी आपण उद्या पत्रकार परिषद घेणार असल्याचे जाहीर केले आहे. यावेळी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, जिल्हा बँकेतील १८ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली असून, खावटी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळावी यासाठी आपले प्रयत्न सुरू असून कर्ज माफी मिळेपर्यंत आपण प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच येणारी जिल्हा बँक निवडणूक ही महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातूनच लढवली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.