You are currently viewing खा. विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त ४५ वर्षांवरील नागरिकांना मोफत कोविड लस

खा. विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त ४५ वर्षांवरील नागरिकांना मोफत कोविड लस

कुडाळ मालवण मतदारसंघातील नागरिकांसाठी आ. वैभव नाईक यांचा उपक्रम

खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त १५ मार्च रोजी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या वतीने कुडाळ मालवण मतदारसंघातील ४५ वर्षांवरील नागरिकांना खाजगी रुग्णालयामध्ये मोफत कोविड लस देण्यात येणार आहे.याचा लाभ घेण्यासाठी ४५ वर्षांवरील नागरिकांनी १५ मार्च २०२१ पर्यंत आधारकार्ड व रेशन कार्डसह नावनोंदणी करावी.
नावनोंदणीसाठी कुडाळ तालुक्यातील नागरिकांनी कुडाळ शिवसेना शाखा येथे बाबी गुरव- ८८०६८३४५४७ व मालवण तालुक्यातील नागरिकांनी मालवण शिवसेना शाखा येथे अनंत पाटकर – ९४०४७५०१९४ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × one =