You are currently viewing सावंतवाडीत राष्ट्रवादीचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा

सावंतवाडीत राष्ट्रवादीचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा

माजी मंत्री तथा आमदार श्री. बाळासाहेब पाटील यांची उपस्थिती..

 

सावंतवाडी:

 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आज दि. १३ ऑक्टोबर रोजी रविंद्र मंगल कार्यालय येथे सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यकर्ता मेळाव्यात माजी मंत्री तथा आमदार श्री. बाळासाहेब पाटील उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे. कार्यकर्ता मेळाव्यास जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री. अमित सामंत व राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभागीय अध्यक्ष सौ. अर्चना घारे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा