You are currently viewing सिंधुदुर्गनगरी येथे 9 डिसेंबर 2020 रोजी डाक अदालतीचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी येथे 9 डिसेंबर 2020 रोजी डाक अदालतीचे आयोजन

– अधीक्षक डाकघर के.एन.बावनकुळे

सिंधुदुर्गनगरी 

पोस्टाच्या कार्यपध्दतीविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल, अशा तक्रारींची दखल घेण्यासाठी दिनांक 9 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11.00 वाजता अधीक्षक डाकघर, सिंधुदुर्ग विभाग सिंधुदुर्गनगरी येथे डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अधीक्षक डाकघर, के.एन बावनकुळे यांनी दिली आहे.

     विशेषत: टपाल,स्पीडपोस्ट काऊंटर सेवा, डाक वस्तू, पार्सल, बचत बँक व मनिऑर्डर याबाबतच्या तक्रारी या डाक अदालीतमध्ये विचारात घेतल्या जातील. तक्रारीचा उल्लेख सर्व तपशिलासह केलेला असावा. उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास पाठविली असेल त्याचे नाव व हुद्दा इत्यादी. संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार         श्री. के.एन. बावनकुळे, अधीक्षक डाकघर, सिंधुदुर्ग विभाग, सिंधुदुर्गनगरी 416812 यांच्या नावे दिनांक 5 डिसेंबर 2020 पर्यंत अथवा त्यापुर्वी पोाहेचेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही असे, के.एन. बावनकुळे, अधीक्षक डाकघर, सिंधुदुर्ग विभाग, सिंधुदुर्गनगरी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 + seventeen =