*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाचे सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखक अरुण वि. देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
—
*श्रीगोंदवलेकरमहाराज काव्यचरितावली-काव्यपुष्प- ४७ वे*
—————————————–
श्रीमहाराजांचा निष्ठावान भक्त
नाव होते त्याचे भिकाजी श्रीपत
बतशा घोडा स्वतःचा असलेला
श्रीमहाराजांना हो अर्पण केला ।।
छान सुंदर असा बताशा घोडा
अंगात होत्या याच्या बऱ्याच खोड्या
इतर कुणा कधी दाद ना देई
महाराज दिसता शरण जाई ।।
बताशा घोडा महाराजांना आवडे
इतरांचे बसणे घोड्यास वावडे
बसला कधी कुणी त्यावरी जरी
करुनी धिंगाणा खाली त्याला पाडे ।।
शाहूरावने महाराजांचा होकार
गृहीत धरून बताशाला नेला
असे सहन नाहीच झाले त्याला
अश्रू ढाळीत तो उपाशी राहिला ।।
मुकाट्याने शाहूराव गोंदवले आले
घोड्यास महाराजांच्या स्वाधीन केले
पाहुनी प्रेम अलौकिक हे आगळे
भक्त आता बताशाला वंदू लागले ।।
लिहिता अशी भक्ती रसाळ गाथा
श्रीमहाराजांच्या चरणी नमवितो
कवी अरुणदास त्याचा हो माथा …
क्रमशः..
———– —————————-
श्रीगोंदवलेकरमहाराज काव्यचरितावली काव्यपुष्प-४७ वे
कवी- अरुणदास -अरुण वि.देशपांडे-पुणे
————————————-