स्वातंत्र्य

स्वातंत्र्य

घे उंच उंच भरारी तू,
अवकाशात झेपावूनी.
खुश होतील नयन माझे,
तुला उडताना पाहूनी.

मोकळा विहार करताना,
विसरू नकोस घरट्याला.
मायेची ऊब तिथेच मिळे
आधार तोची जगण्याला.

पंखात तुझ्या येता बळ,
झाडे वेली तुझे सोबती.
हवेत घिरट्या घालताना,
वाऱ्यासवे होई तुझी दोस्ती.

संकटेही येतील जीवनात,
नको डगमगू नको घाबरू.
जिद्द हिम्मत बाळगता मनी,
जीवन तुझे लागे सावरू.

मोह माया सुन्या पिंजऱ्यात,
मिष्ठांन्न सदा मिळे पुढ्यात.
पारतंत्र्यात कुठे असे आनंद,
निर्भेळ सुख मिळे स्वातंत्र्यात.

(दिपी)✒️
दीपक पटेकर, सावंतवाडी

प्रतिक्रिया व्यक्त करा