You are currently viewing आनंदघन

आनंदघन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*”आनंदघन”* 

श्रीराम आहे अनादी आनंदी घन

धर्मात्मा धर्म वत्सल असे धर्मज्ञ IIधृII

 

अंतर्यामी सदा जपावे रामनाम

अवीट गोडीचे नाम करूया स्मरण

जीवन एक भक्ती योग जाई बनूनII1II

 

राम कथा ऐकाव्या नाम घ्यावं वाणीनं

मेघ:शाम मूर्ती पहावी ती डोळयानं

सर्वकाळ करावे श्रीरामाचे चिंतनII2II

 

दयाळूरूप सुंदर असे कमल नयन

मुखावर आश्वासक भाव राहे विलसून

धनुर्धारी बघून कळीकाळ जाय पळूनII3II

 

श्रीराम आदर्श पूत्र पती भ्राता सगुण

मर्यादाशील पराक्रमी असे युद्ध निपूण

गाऊ श्रीराम जय राम गुणगानII 4II

 

श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन 410201.

Cell.9373811677.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा