You are currently viewing भाजपच्या कमळ यचिन्हावरच खासदार निवडून येईल –  आम. नितेश राणें:

भाजपच्या कमळ यचिन्हावरच खासदार निवडून येईल –  आम. नितेश राणें:

भाजपच्या कमळ यचिन्हावरच खासदार निवडून येईल –
आम. नितेश राणें:

महायुतीचाच खासदार विजयी करण्यासाठी आमचे वॉरियर्स तयार…

सावंतवाडी

सावंतवाडी निलेश राणे यांना साडेतीन लाख मते मिळाली होती आणि भारतीय जनता पार्टीची रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघांमध्ये दहा लाख मते हक्काची आहेत त्यामुळे भाजपच्या कमळ या चिन्हावरीलच खासदार निवडून येईल असा विश्वास कणकवली देवगड चे भाजपा आमदार नितेश राणे यांनी सावंतवाडी येथे बोलताना व्यक्त केला ते महाविकास संकल्प 2024 अभियानांतर्गत आयोजित समारंभ प्रसंगी सावंतवाडीत आले असता पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल कासेकर महेश सारंग मनीष दळवी एकनाथ नाडकर्णी राजन म्हापसेकर संदीप मेस्त्री श्वेता कोरगावकर चेतन चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष संजू परब मंडल अध्यक्ष रवींद्र मडगावकर महेश धुरी प्रथमेश तेली शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे दिलीप भालेकर आदी उपस्थित होते.

उमेदवार कोण असेल हे वरिष्ठ ठरवतील पक्षाने दिलेल्या उमेदवाराला निवडून आणणे आणि महायुतीचाच खासदार विजयी करण्यासाठी आमचे वॉरियर्स तयार आहेत कमळ चिन्हाचाच खासदार असावा अशी भावना कार्यकर्त्यांची असून ही भावना वरिष्ठापर्यंत पोहोचवण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी त्यांनी उबाठा चे खासदार विनायक राऊत यांना यापुढे खासदार म्हणून ठेवणार नाही भविष्यातील खासदार महायुतीचाच दिसेल शत प्रतिशत भाजप असेल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला
ज्याप्रमाणे सैनिक आपला देश जिंकला पाहिजे यासाठी काम करतो तशाच प्रकारे भारतीय जनता पार्टी आगामी काळातील निवडणुकांमध्ये विजय होण्यासाठी सुपरवारीर्यस ची नेमणूक करण्यात आली आहे हे वॉरियर्स म्हणजे महेश सारंग आणि संजू परब पॅटर्न असून भाजपची ताकद कमी न होता पक्ष जिंकला पाहिजे या भूमिकेतून रणांगणात उतरले असल्याचे त्यांनी सांगितले
सावंतवाडी येथील शहाबुद्दीन हॉल येथे बोलताना त्यांनी जिल्हा उपाध्यक्ष संजू परब आणि जिल्हा बँकेचे संचालक महेश सारंग यांच्या कामाचे कौतुक केले ते चांगले उपक्रम राबवत असल्याचे ते म्हणाले किरण सामंत यांच्या स्टेटस बाबत विचारले असता सामंत यांचा राग पवारांवर होता त्यांचा भाजप वर राग नसल्याचे ते म्हणाले त्यांनी भारतीय जनता पार्टीत यावे याचा त्यांनी पुनरुचार केला

*संवाद मीडिया*

*_🍽️”बेलिफ द किचन” 🍽️_*

*_🤗आम्ही आलोय आता बांद्यात…!!🥳_*

*🏢सावंतवाडीतील ग्राहकांच्या👥 उदंड प्रतिसादा 🤗 नंतर तीच चव आणि तोच दर्जा घेवून 👌🏻तुमच्या आवडीच*

*_🍽️”बेलिफ द किचन” 🍽️_*
* बांद्या…!!🛣️*

*🍱खवय्यांना पर्वणी ठरणारे अनेक पदार्थ..🤤*

*पिझ्झा🍕, बर्गर🍔, सँडविच 🥞, शोरमा🫔, मोमोज🍚 यासह स्पेशल बिर्याणी🍛 व तंदूर🥘*

*_🔖शुभारंभ २ ऑक्टोबर.._*

*आमचा पत्ता:-*👇

*🍽️”बेलिफ द किचन”🍽️*

*निवी निकी कॉम्प्लेक्स हॉटेल, कावेरीच्या समोर, मुंबई-गोवा महामार्ग*

*📲संपर्क:-*
*९१५८९८७६७८ / ९२७३८२५२३२*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110721/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा