You are currently viewing तिमिरातुनी तेजाकडे या उपक्रमाची सावंतवाडी पासून सुरूवात…

तिमिरातुनी तेजाकडे या उपक्रमाची सावंतवाडी पासून सुरूवात…

सावंतवाडी

आज दिनांक 1 डिसेंबर 2020 रोजी सावंतवाडीमध्ये सिद्धिविनायक सभागृह, माजगाव येथे तिमिरातुनी तेजाकडे या उपक्रमाचे सावंतवाडी तालुक्यात सुरूवात करण्यासाठी बैठक यशस्वीरित्या पार पडली.

तिमिरातुनी तेजाकडे या उपक्रमास श्री. सत्यवान रेडकर, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, राजस्व विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकार प्रमुख मार्गदर्शक,  यांच्या उपस्थितित व मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त युवकवर्गाने याचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.

यावेळी श्री प्रमोद गावडे (निरवडे- सरपंच), श्री. प्रेमानंद देसाई (केर- सरपंच), श्री. दिनेश सावंत (माजगाव- सरपंच), श्री.वासुदेव जोशी, (नाणोस- सरपंच), सौ. स्नेहा मिठबावकर, (वेत्ये- सरपंच), श्री. अभिलाष देसाई (तांबुळी- सरपंच), श्री. संजय कानसे, (माजगाव- उप सरपंच), श्री. हनुमंत सावंत, माजी मुख्याध्यापक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 + nineteen =