*माजी खासदार डॉ.निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती*
*कुडाळ येथे इंदुरीकर महाराजांचे कीर्तन*
कुडाळ:
भाजपचे युवा नेते तथा युवा उद्योजक विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त विशाल अभिष्टचिंतन सोहळ्याला प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाने प्रारंभ होणार आहे. कुडाळ येथील श्री वासुदेवानंद ट्रेड सेंटर येथे सोमवारी 9 ऑक्टोबरला सायंकाळी सात वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
माजी खासदार निलेश राणे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार प्रमोद जठार, दत्ता सामंत, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजू परब, अशोक सावंत, रणजीत देसाई उपस्थित राहणार आहेत.
विशाल परब अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त ९ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत दोडामार्ग,वेंगुर्ले, सावंतवाडी या ठिकाणी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सावंतवाडीत १५ ऑक्टोबरला विशाल परब जन्मदिनानिमित्त जिमखाना मैदानावर प्रख्यात सिंगर जुबीन नौटियाल यांचा लाईव्ह कॉन्सर्ट होणार आहे. त्याचीही जय्यत तयारी करण्यात येत आहे. सोमवार ९ ऑक्टोबरला सायंकाळी ७ वाजता कुडाळ येथे या अभिष्टचिंतन सोहळ्याचा शुभारंभ होणार आहे.
हा सोहळा आणि अभिष्टचिंतन कार्यक्रम विशाल परब मित्र मंडळ व भाजप यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
कुडाळ श्री वासुदेवानंद ट्रेड सेंटर येथे कार्यक्रमासाठी भव्य स्टेज व बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते अभिष्टचिंतन सोहळ्याचा शुभारंभ होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात इंदुरीकर महाराजांचे कीर्तन प्रथमच होत असल्याने किर्तन ऐकण्यासाठी गावागावातून मोठ्या संख्येने नागरिक,भक्तगण, वारकरी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या सोहळ्याला येणाऱ्या सर्व नागरिकांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे या सोहळ्याला व इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाला श नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विशाल परब मित्र मंडळ व भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.
विशाल परब यांचा वाढदिवस 15 ऑक्टोबरला सावंतवाडी येथे होणार आहे.यानिमित्त सिंगर जुबीन नॉटीयाल यांचा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी गावागावात समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.त्या ठिकाणी फॉर्म भरून प्रवेशासाठी ब्रँड देण्यात येणार आहे. या लाईव्ह कॉन्सर्ट चा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपचे सावंतवाडी शहर मंडळ अध्यक्ष अजय गोंदावले यांनी केले आहे. त्याचबरोबर 11 ऑक्टोबरला क्रांती नाना मळेगावकर यांचा खेळ पैठणीचा कार्यक्रम दोडामार्ग येथे सायंकाळी सात वाजता होणार आहे. तर 13 ऑक्टोबरला विशाल दांडिया स्पर्धा वेंगुर्ले कॅम्प स्टेडियम येथे सायंकाळी सात वाजता आयोजित करण्यात आली आहे.