You are currently viewing मनोरंजन विश्वाला धक्का… अभिनेत्री व्हीजे चित्रा ने केली आत्म्हत्या

मनोरंजन विश्वाला धक्का… अभिनेत्री व्हीजे चित्रा ने केली आत्म्हत्या

मनोरंजन विश्वातून आणखी एक दुःखद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध तमिळ अभिनेत्री व्हीजे चित्रा हिचे निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार २८ वर्षीय अभिनेत्रीने आत्महत्या केली असून तिचा मृतदेह चेन्नईतील एका हॉटेलच्या खोलीत आढळून आला आहे.

 

काही महिन्यांपूर्वी व्हीजे चित्रा हिचा साखरपुडा बिझनेसमन हेमंतशी झाला होता. माहितीनुसार, चित्रा ईव्हीपी फिल्म सिटी येथे शूटिंगनंतर अडीचच्या सुमारास हॉटेलवर परतली. ती आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच हॉटेलमध्ये थांबली होती. पोलिसांना दिलेल्या जबाबात हेमंत याने सांगितले की, हॉटेलमध्ये आल्यानंतर चित्राने सांगितले की ती आंघोळीसाठी जात आहे पण ती फार वेळ बाहेर आली नाही आणि दरवाजा ठोठावल्यानंतर देखील तिने काहीच प्रतिक्रिया दिली नाही.त्यानंतर हेमंत यांनी हॉटेल कर्मचार्‍यांना याबाबत माहिती दिली आणि डुप्लिकेट चावीने दार उघडलं असता तिचा मृतदेह सीलिंगला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

 

सीरियल Pandian Stores मधील अभिनेत्री चित्रा हिच्या मृत्यूबद्दल आतापर्यंत तिच्या कुटुंबीयांनी किंवा मित्रांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दुसरीकडे, तिच्या चाहत्यांना अद्यापही विश्वास बसत नाहीए की, ती आता या जगात नाही. चित्राने आत्महत्या केली आहे आणि ती या जगात नाही यावर त्यांचा विश्वासच बसत नसल्याचे तिचे चाहते ट्वीट करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 5 =