सावंतवाडी :
सावंतवाडीतील गवळी तिठा येथील वैश्यभवनच्या श्री स्वामी समर्थ पॉली क्लिनिक येथे बुधवारी ११ जून रोजी सकाळी १० ते सायंकाळी ३ वाजेपर्यंत मोफत रुग्ण तपासणी व ब्लड शुगर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात दिल्ली येथील अपोलो हॉस्पिटलचे प्रसिद्ध मधुमेह तज्ञ डॉ आदिल अहमद उपस्थित राहून रुग्णांची तपासणी करणार आहेत. या शिबिरात प्रथम नाव नोंदणी करणाऱ्या ५० रुग्णांची AbA1 C ब्लड शुगर टेस्ट मोफत करण्यात येणार आहे. इच्छुक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा आणि ९४०३०३५०९४ व ९४२२४३४९६५ या मोबाईल नंबरवर नाव नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.