*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*उधारीचं भांडण !*
आजच काम आजच करा
उद्यावर कधीही ढकलू नका
भांडणाची संधी येताच
असे सोनेरी क्षण दवडू नका..
सौजन्याची सदा ऐशीतैशी
शब्दांना मुहूर्त शोधू नका
स्वतःहून धक्का!धडक मारा
पण साॅरी कधीच म्हणू नका..
सार सुरळीत तर निराशा येते
समोरच्याला त्याची जागा दाखवा
उगाच !शब्दांना उंच टाचा नको
जमीनीच्या शब्दांचा सर्रास वापर करावा
उखाणे कोडी! माय भाषेची गोडी घ्या
उधारीच भांडण उकरून काढा
खुल्या तुरुंगात!दृतगती न्यायालयात
भांडणातूनच सदैव माणसं जोडा..
माझ्यावतीने भांड!पण एकदा भांडून घे
नाहीतर घशाखाली घास उतरणार नाही
शब्दचं विद्रोह!शब्दच विद्वेष! शब्दचं चेतना ..!दे शिव्या..मोकळा हो..
अपशकुनाची भीती शब्दांना वाटत नाही
जे क्षण भांडणात वाहून गेलेत
ते फिरूनही माघारी परत येत नाही
जन्मभराचे सोबती लाभलेत पण आज
दाराला माझ्या !आडनावाची पाटी नाही..उधारीच्या भांडणाशिवाय जगण्याची मजाही नाही…..!!
भांडा!खूप भांडा!भांडत राहा..!!!
बाबा ठाकूर धन्यवाद