You are currently viewing मिलाग्रिस हायस्कूलचे जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेत यश…

मिलाग्रिस हायस्कूलचे जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेत यश…

मिलाग्रिस हायस्कूलचे जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेत यश…

सावंतवाडी

येथील मिलाग्रिस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेत यश संपादन केले आहे. यात १७ वर्षांखालील मुलींच्या गटामध्ये प्रथम क्रमांक कु. आलिया दर्गावाले, द्वितीय क्रमांक कु. प्रिया राणे तर तृतीय क्रमांक कु. कृतिका परब यांनी प्राप्त केला आहे. १४ वर्षांखालील मुलगे गटामध्ये कु. सुशोभन सावंत याने प्रथम क्रमांक तर १७ वर्षांखालील मुलगे गटामध्ये कु. सर्वेश सावंत याने तृतीय क्रमांक मिळवून यश प्राप्त केले

वरील सर्व विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षिका शेरॉन अल्फान्सो यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांनी अभिनंदन केले. यावेळी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल, पर्यवेक्षिका सौ.मेघना राऊळ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा