You are currently viewing काव्यपुष्प – ४५ वे

काव्यपुष्प – ४५ वे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य लेखक कवी श्री अरुण वि. देशपांडे लिखित श्रीगोंदवलेकरमहाराज काव्यचरितावली*

 

*काव्यपुष्प-४५ वे*

—————————————–

बाळपणापासून महाराजांच्या मनी

श्रीरामप्रभू भक्ती ज्योती तेवत होती

रामनामाची भाव वृत्ती फुलली होती

तन-मन वृत्ती लीन झाली राम चरणी ।।

 

घडते जे जे सगळे, राम इच्छा खरे

केले मी” असे महाराज कधी न बोले

श्रीरामराय प्रति अनन्य भावे बोले

ते म्हणती-राम काय करील ते खरे ।।

 

भक्तजनांच्या सोयीसाठी महाराजांनी

स्वतःच्या घराच्या समोर भागामध्ये

छान राम मंदिर बांधणे सुरू केले

भक्त निधीतून हे काम होऊ लागले ।।

 

१८८१ साली मंदिर बांधून झाले

मूर्ती कशा ,इथे कोण घेऊनी येणार ?

विचारणा महाराजांना करू लागले

करील राम सोय सारी, सांगू लागले ।।

 

तडवळ गावीचे कुलकर्णी भक्त एक

गोंदवल्यास महाराजांना भेटण्या आले

मूर्ती- “राम, लक्ष्मण-सीता ,घेउनी आले

श्रीमहाराजांनी पाहुण्यांचे स्वागत केले

म्हणे-कवी अरुणदास, रामरायाचे

गोंदवल्यास ऐसे आगमन हो झाले ।।

*******

क्रमशः…

—————————————-

 

कवी- अरुणदास -अरुण वि.देशपांडे- पुणे

9850177342


 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा