You are currently viewing *मी पळ काढणारा आमदार नाही- आ. वैभव नाईक*

*मी पळ काढणारा आमदार नाही- आ. वैभव नाईक*

*मी पळ काढणारा आमदार नाही- आ. वैभव नाईक*

*केंद्र व राज्य सरकारकडून जनतेची लूट – गुरुनाथ खोत*

*पोईप बाजारपेठ व मालवण शहर येथे “होऊ दे चर्चा विचारा प्रश्न..!” अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद*

विरोधी पक्षाचे लोक शिवसेनेच्या “होऊ दे चर्चा विचारा प्रश्न..!” या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. सामान्य जनतेने मला दोन वेळा निवडून दिले आहे. त्यामुळे मी पळ काढणारा आमदार नाही. एसीबी, ईडी चौकशी लागली तरी पक्ष सोडून भाजपमध्ये जाणारा वैभव नाईक नाही. ५० खोके घेऊन गद्दारी करणारा वैभव नाईक नाही.या मतदारसंघाचा आमदार म्हणून विरोधी पक्षाच्या लोकांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याचे काम मी करणार आहे. असे आमदार वैभव नाईक यांनी पोईप येथे ठणकावून सांगितले.

केंद्र व राज्यातील भाजप सरकारने दिलेल्या आश्वासनांचा आणि बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार आज पोईप बाजारपेठ व मालवण शहर येथे “होऊ दे चर्चा विचारा प्रश्न..!” हे अभियान संपन्न झाले. या अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

अभियानाचे निरीक्षक, शिवसेना नेते गुरुनाथ खोत म्हणाले,केंद्र व राज्य सरकारकडून जनतेची लूट सुरु आहे. २०१४ साली गॅस ४०० रुपयाला मिळत होता तो आता मोदी सरकारच्या काळात १२०० रु झाला. पेट्रोल डिझेलचे दर वाढले हे कोणामुळे वाढले.मराठी माणसाच्या प्रश्नांना न्याय मिळाला आहे का?मराठा समाज, धनगर समाजाला आरक्षण मिळाले का? खुलेआम महिलांवर अन्याय अत्याचार केले जात आहेत. रुग्णालयात अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. कोरोना काळात उद्धवजी ठाकरे यांची प्रकृति ठीक नसताना देखील त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला सांभाळले. धारावी पॅटर्न जगभर गाजला. मात्र आताचे सरकार हे स्वतःच्या हितासाठी बनले आहे. त्यांना जनतेचे काहीही पडलेले नाहीअसे त्यांनी सांगितले.

आ. वैभव नाईक पुढे म्हणाले, राज्यात औषधे नसल्यामुळे छोट्या छोट्या बालकांना जीव गमवावा लागला. सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातही औषध खरेदी केलेली नाही. खावटी कर्जे माफ झालेली नाहीत. लाईट बिलाचे दर वाढले आहेत. एकीकडे भाजपकडून हिंदू खतरेमे है असे सांगितले जाते तर दुसरीकडे हसन मुश्रीफ, अब्दुल सत्तार या सगळ्यांना मंत्री केले आहे. यावर चर्चा झालीच पाहिजे. असे त्यांनी सांगितले.
जिल्हा समन्वयक प्रदीप बोरकर म्हणाले, भाजपने खोटी आश्वासने देऊन लोकांची फसवणूक केली आहे.सरकारी कंपन्यांचे खाजगीकरण केले जात आहेत. ईडीच्या कारवाई पासून वाचण्यासाठी पक्षाशी गद्दारी करून काही आमदारांनी भाजप सोबत सरकार स्थापन केले हे जनतेच्या हितासाठी स्थापन झालेले सरकार नाही. आमदार गेले असले तरी येणाऱ्या निवडणुकीत शिवसैनिक त्यांना त्यांची जागा दाखवतील असे त्यांनी सांगितले.
नितीन वाळके म्हणाले देशातील लोकशाहीला काळिमा फासणाऱ्या ९ वर्षांच्या केंद्र सरकारच्या कामाचा पंचनामा करण्यासाठी होऊ दे चर्चा अभियान राबविले जात आहे.महागाई,बेरोजगारी या जनतेच्या मनातल्या प्रश्नावर आवाज उठवून त्याची उत्तर या सरकारकडून मिळवायची आहेत
आता संघर्ष करण्याची वेळ आली आहे. २०२४ साली भाजपला हद्दपार करून जनतेच्या हिताचे सरकार आणायचे आहे असे जान्हवी सावंत यांनी सांगितले.
हरी खोबरेकर यांनीही राज्य सरकारवर टीका करत २०२४ ला उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे असे आवाहन केले.
याप्रसंगी मालवण येथे माजी बांधकाम सभापती मंदार केणी, शहर प्रमुख बाबी जोगी,युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर,महेश जावकर, सन्मेष परब, उपजिल्हा संघटक सेजल परब, तालुका प्रमुख पूनम चव्हाण, यशवंत गावकर,गौरव वेर्लेकर,उमेश मांजरेकर, तपस्वी मयेकर,किरण वाळके, गणेश कुडाळकर,रेवंडी सरपंच अमोल वस्त, कोळंब सरपंच सिया धुरी,आकांक्षा शिरपुटे,तृप्ती मयेकर,रश्मी परुळेकर,सुर्वी लोणे,समीर लब्दे, राजेश गावकर, प्रवीण लुडबे,अंजना सामंत,नंदा सारंग, वैभव खोबरेकर,नरेश हुले,अक्षय रेवंडकर,चंदू खोबरेकर,तेजस लुडबे,संतोष अमरे आदी.
पोईप येथे विभाग प्रमुख विजय पालव, युवासेना उपजिल्हाप्रमुख पंकज वर्दम,उपतालुकाप्रमुख अमित भोगले, कृष्णा पाटकर,पराग नार्वेकर,आरती नाईक,दिपा शिंदे, सुभाष धुरी,अरुण लाड,आशिष परब,राजू नाडकर्णी,शिवरामपंत पालव, भाऊ चव्हाण, प्रशांत सावंत,बंडू चव्हाण,नाना परब,श्री. मिटबावकर, मोहन घाडीगावकर,पिंटू गावकर, संदीप हडकर,दिनेश परब, जयेश नार्वेकर,बाळा सांडव, स्वप्नील पुजारे,अनिल हेरम,आबा परब,राहुल सावंत,राजू गावडे,बंडू गावडे,विकास गावडे,आनंद सावंत,नंदू गावडे,विकास परब, प्रतीक घाडी, नाना नेरकर,रुपेश वर्दम यांसह शिवसैनिक महिला उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा