You are currently viewing सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानच्या सावंतवाडी तालुका कार्यकारणी अध्यक्षपदी हेमंत मराठे यांची नियुक्ती

सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानच्या सावंतवाडी तालुका कार्यकारणी अध्यक्षपदी हेमंत मराठे यांची नियुक्ती

सावंतवाडी
सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग” च्या सावंतवाडी तालुका कार्यकारिणी अध्यक्षपदी हेमंत रमाकांत मराठे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानच्या सावंतवाडी तालुका कार्यकारिणीची निवड करण्यासाठी रविवार दिनांक २९ नोव्हेंबर २०२० रोजी भटवाडी, सावंतवाडी येथील वि. स. खांडेकर विद्यालयाच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीत सावंतवाडी तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली. या बैठकीत सावंतवाडी तालुका कार्यकारिणी अध्यक्ष म्हणून हेमंत रमाकांत मराठे यांची एक मताने निवड करण्यात आली तसेच सचिव म्हणून बाबली गवंडे, उपाध्यक्ष मंगल कामत व महेश शिरोडकर, सहसचिव अनिकेत सावंत, खजिनदार दीपक तारी, सहखजिनदार सिद्धार्थ पराडकर, सल्लागारपदी जगदीश मांजरेकर या पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली. सदस्य म्हणून निलेश मोरजकर, राकेश परब,अवधूत गावडे, सुधीर पराडकर, विद्याधर नाईक, संदीप चांदेकर, अनिल जाधव, सौ सुप्रिया मोडक, सुनील र राऊळ, अनिल विष्णू जाधव, यांची निवड करण्यात आली. निवड करण्यात आलेल्या पदाधिकारी व सदस्यांचे जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडुलकर, जिल्हा सचिव किशोर नाचणोलकर व जिल्हा सदस्य एकनाथ चव्हाण यांनी अभिनंदन केले. जिल्ह्यातील व तालुक्यातील रक्ताची गरज असणाऱ्या रुग्णांना तात्काळ रक्त उपलब्ध करून देणे, गावागावात रक्तदाते तयार करणे युवकांमध्ये रक्तदानाबद्दल असलेले गैरसमज व भीती दूर करणे, कॉलेज, शाळा या ठिकाणी प्रतिष्ठानच्या मार्फत चर्चासत्र घेऊन रक्तदानाबद्दल जनजागृती करणे, आरोग्य विभागात रुग्ण सेवेबद्दल असलेल्या गैरसोयीबद्दल आवाज उठवणे तसेच गावागावात रक्तदान शिबिरे आयोजित करणे अशा प्रकारचे कार्य या प्रतिष्ठानच्या मार्फत करण्याचा मानस असल्याचे जिल्हाध्यक्ष तेंडुलकर यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा