You are currently viewing मसुरे विठ्ठल मंदिर येथे उद्या पासून हरिनाम सप्ताह

मसुरे विठ्ठल मंदिर येथे उद्या पासून हरिनाम सप्ताह

मसुरे विठ्ठल मंदिर येथे उद्या पासून हरिनाम सप्ताह!

मालवण

मसुरे मर्डेवाडी येथील श्री देव विठ्ठल मंदीर येथे मंगळवार ३ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत हरिनाम सप्ताह साजरा होणार आहे. हरिनाम सप्ताहानिमित्त मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई
तसेच चित्ररथ देखावे करण्यात येणार आहेत. १० ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता मंदीरामध्ये महाप्रसाद होणार आहे. भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री देव विठ्ठल मंदीर ट्रस्ट मसुरे मर्डेवाडी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा