You are currently viewing नांदगाव तिठा येथे आशिकाने मुस्तुफा शिरत कमेटीच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

नांदगाव तिठा येथे आशिकाने मुस्तुफा शिरत कमेटीच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

नांदगाव तिठा येथे आशिकाने मुस्तुफा शिरत कमेटीच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

कणकवली

नांदगाव तिठा येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही ईद ए मिलादुननबी जलसा मुबारक निमित्ताने आशिकाने मुस्तुफा शिरत कमेटीतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते .

शिरत कमेटीचे हे सहावे वर्ष आहे. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी नांदगाव सरपंच रविराज मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर, सामाजिक कार्यकर्ते रज्जाक बटवाले, रमिजान बटवाले, सदस्य ग्रामपंचायत यासिर मास्के, शाहिद बटवाले, जुबेर मास्के, तैयब बटवाले, यासिन नावलेकर, गफार बटवाले, तन्वीर साटविलकर , पोलिस किरण मेथे आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी अमित यादव यांनी ईद मुबारक निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या व आशिकाने मुस्तुफा शिरत कमेटीचे कौतुक केले व रक्तदान हे सर्वांत महत्त्वाचे दान आहे जसे आपण अवयव दान करतो व अडीअडचणीला धावून जातो तेव्हा असे समाजपयोगी काम महत्वाचे आहे. असे चांगले उदगार काढले रक्तदान शिबीरला अनेक मान्यवर यांनी भेट दिली या वेळी ३५ रक्तदान झाले व ७० रक्तगट तपासणी झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा