You are currently viewing खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी प्रकरणी सावंतवाडी वनविभागाच्या पथकाची कारवाई..

खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी प्रकरणी सावंतवाडी वनविभागाच्या पथकाची कारवाई..

तब्बल दोन किलो खवले आणि दोन दुचाकी जप्त

 

सावंतवाडी :

 

खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी केल्याप्रकरणी सावंतवाडी वनविभागाच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई आज दुपारी बांदा आरोग्य केंद्राच्या परिसरात करण्यात आली. त्यांच्या कडून तब्बल दोन किलो खवले आणि दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. नारायण सावळाराम नाईक (वय ४८, रा. किनळे) सदगुरू मारुती नाईक (वय ५२ रा. पेडणे) असे त्यांचे नाव आहे. उद्या त्यांना येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सावंतवाडी वनपरिक्षेत्र अधिकारी मदन क्षीरसागर यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल पृथ्वीराज प्रताप, वनरक्षक प्रकाश रानगिरे, अप्पासो राठोड यांच्या पथकाने बांदा येथे सापळा रचला. रचलेल्या सापळ्यानुसार संबंधित खवले मांजराच्या खावल्यांच्या विक्रीचा व्यवहार कारण्यासाठी बांदा येथे दुपारच्या दरम्यान आले असता वन विभागाच्या टीमने त्यांच्यावर झडप घालून ताब्यात घेतले. ही कारवाई सावंतवाडी उपवनसंरक्षक एस नवकिशोर रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक सुनिल लाड यांचे मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, वनपाल पृथ्वीराज प्रताप, वनरक्षक प्रकाश रानगिरे यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. खवले मांजर हा दुर्मिळ प्राणी आपल्या नैसर्गिक परिसंस्थेमध्ये महत्वाची भूमिका बजावतो. मुग्यांची व कीटकांची संख्या नियंत्रित करून नैसर्गिक समतोल अबाधित राखतो. खवले मांजराच्या खावल्यांबाबत समाजात पसरवलेल्या काही गैरसमजामुळे या दुर्मिळ वन्यजीवाची जगभरात मोठ्या प्रमाणावर शिकार केली जाते. सावंतवाडी वन विभागाकडून या दुर्मिळ वन्यजीवाच्या संवर्धनासाठी ‘खवले मांजर वाचवा मोहीम’ राबविली जात असून सर्व सुजाण नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की खवले मांजराच्या शिकारी विषयी आपण बातमी दिल्यास त्याबदल्यात आपला सन्मान करण्यात येऊन इनाम देण्यात येईल. तरी सर्वांनी खवले मांजर संवर्धनासाठी कटिबद्ध रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + 1 =