You are currently viewing वैभववाडीत अकरा दिवसांच्या गणरायांना भक्तीमय वातावरणात निरोप…

वैभववाडीत अकरा दिवसांच्या गणरायांना भक्तीमय वातावरणात निरोप…

वैभववाडीत अकरा दिवसांच्या गणरायांना भक्तीमय वातावरणात निरोप…

वैभववाडी

‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ चा जयघोष करीत तालुक्यात गुरूवारी  अकरा दिवसांच्या गणरायांना भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला.
कोकणात सर्वच ठिकाणी घरोघरी गणपतीचे पूजन केले जाते. कोकण वासियांचा हा मोठा उत्सव सर्वच ठिकाणी आनंदात साजरा केला जातो. दीड, पाच, सात, नऊ, अकरा आणि एकवीस दिवस ठेवून गणेशाचे मनोभावे पूजन केले जाते. व त्यानंतर गणरायाला भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात येतो. या वर्षी १९ सप्टेंबरला घरोघरी तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी गणरायाचे आगमन झाले. गुरूवारी या गणेशोत्सवाला अकरा दिवस पूर्ण झाले. या अकरा दिवसांच्या गणरायांना भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा