You are currently viewing जिल्हा आरोग्य अधिकारी पदी डॉ. सई धुरींची नियुक्ती

जिल्हा आरोग्य अधिकारी पदी डॉ. सई धुरींची नियुक्ती

जिल्हा आरोग्य अधिकारी पदी डॉ. सई धुरींची नियुक्ती

सिंधुदुर्गनगरी

जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. सई धुरी यांची पदोन्नतीने सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य अधिकारी पदी नियुक्ती झाली आहे.

तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेश खलीपे यांची सातारा जिल्हा आरोग्य अधिकारी पदी बदली झाल्यानंतर डॉ. सई धुरी या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकारी पदी प्रभारी म्हणून काम पाहत होत्या.

राज्य शासनाने जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील बदल्यांचा शासन आदेश मंगळवारी जारी केला आहे. या आदेशानुसार जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. सई धुरी यांची सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य अधिकारी पदी बढती झाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा