You are currently viewing सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांची किल्ले सिंधुदुर्गच्या संवर्धनासाठी अभ्यास मोहीम

सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांची किल्ले सिंधुदुर्गच्या संवर्धनासाठी अभ्यास मोहीम

मालवण

गड किल्यांच्या संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्या सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र या संस्थेच्या दुर्गसंवर्धन मोहिमेंतर्गत वारसा दिनानिमित्त संस्थेच्या सिंधुदुर्ग विभागाच्या दुर्गसेवकांनी मालवण मधील ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गसह पद्मदुर्ग, राजकोट आणि सर्जेकोट येथे भेट देत या किल्यांच्या संवर्धनाबाबत अभ्यास केला. किल्ले सिंधुदुर्गच्या संवर्धनासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना राबविण्यासाठी संस्था प्रयत्नशील असून यासाठी पुरातत्व विभागाचे लक्ष वेधून त्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेमार्फत ही कामे मार्गी लावण्याचा करण्यात येणार आहे, असे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष गणेश रघुवीर यांनी सांगितले.

सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र संस्थेच्या सिंधुदुर्ग विभागाचा दुर्गसेवकांच्या पथकाने किल्ले सिंधुदुर्ग भेट देत किल्याची तटबंदी किल्याचे प्रवेशद्वार, मंदिरे, विहिरी यांचा अभ्यास करून या किल्याच्या संवर्धनासाठी आवश्यक ती माहिती संकलित केली. या मोहिमेत सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्रचे अध्यक्ष श्री. गणेश रघुविर, नितीन पानवलकर, विल्सन रॉड्रिग्ज, विवेक गावडे, रोहन पुळासकर सावंत, सुनिल राऊळ, सुधिर राऊळ, ज्ञानेश्वर राणे, सिदेश परब, केदार देसाई, भास्कर मसदेकर, अनिकेत चव्हाण, रूपेश मगर, प्रज्योत खडपकर, शुभम खडपकर, ॠतुराज खडपकर, अक्षय गावडे आदी दुर्गसेवक सहभागी झाले होते.

सह्याद्री प्रतिष्ठानच्या या पथकाची मालवण तालुका मनसेच्या वतीने मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर व विल्सन गिरकर यांनी बंदर जेटी येथे भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी अमित इब्रामपूरकर यांनी किल्ले संवर्धनासाठी सह्याद्री प्रतिष्ठान करीत असलेल्या कार्याचे कौतुक केले.

यावेळी माहिती देताना अध्यक्ष गणेश रघुवीर म्हणाले, सह्याद्री प्रतिष्ठान ही संस्था संस्थापक श्री. श्रमिक चंद्रशेखर गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली बारा वर्ष दुर्गसंवर्धनाचे कार्य करीत आहेत. या संस्थेमार्फत आजपर्यंत विविध किल्यांवर ९०० हुन अधिक दुर्गसंवर्धन मोहिमा तर १७०० अधिक दुर्गदर्शन मोहिमा राबविण्यात आल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्र राज्याबरोबरच उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, बिहार, दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ या राज्यातील गड किल्यांवरही संस्थेने अभ्यास मोहिमा राबविल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह इतिहासातील आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे हे किल्ले जिवंत ठेवायचे असतील तर त्यांचे संवर्धन आपल्यालाच करावे लागणार आहे. मालवण येथील किल्ले सिंधुदुर्गला मोठे ऐतिहासिक महत्त्व असून त्याचे संवर्धन होणे गरजेचे आहे. किल्ल्यातील काही ठिकाणी ढासळलेल्या तटबंदीची डागडुजी करणे, वाढलेली झाडी तोडणे, विहिरींची सफाई करणे, प्लास्टिक कचरा निर्मूलन, परिसर स्वच्छता आदी बाबत संस्थेला कार्य करावयाचे असून त्यासाठी पुरातत्व विभागासह गडकिल्ल्यांशी संबंधित शासनाच्या इतर विभागांकडे संस्था पाठपुरावा करणार आहे आणि शासनाच्या सहकार्याने सिंधुदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी आवश्यक कार्य संस्था करणार आहे, असेही गणेश रघुवीर यांनी सांगितले.

मालवण येथील किल्ले सिंधुदुर्गच्या संवर्धनासाठी अभ्यास मोहीम राबविणाऱ्या सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र या संस्थेच्या दुर्गसेवकांचे स्वागत करताना मनसेचे अमित इब्रामपूरकर, विल्सन गिरकर व इतर.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − one =