You are currently viewing बांदा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने यांचे निधन.

बांदा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने यांचे निधन.

बांदा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने यांचे निधन.

सावंतवाडी

तालुक्यातील बांदा येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सीताराम माने यांचे हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने काल (शनिवारी ) निधन झाले.

माने हे मुळ महाड येथील असून सध्या सावंतवाडी येथे राहत होते. ते बांदा पोलीस ठाण्यात सुरुवातीला जमादार होते. कठोर मेहनतीच्या जोरावर त्यांनी पोलीस खात्यांतर्गत परीक्षा उत्तीर्ण होऊन ते पोलीस उपनिरीक्षक झाले होते. त्यांना प्रशासकीय बाबींची उत्तम जाण होती.
अनेक गुन्ह्यात त्यांनी निर्णायक भूमिका बजावली होती. त्यांच्या अचानक निधनाने पोलीस कर्मचाऱ्यात व पोलीस प्रशासनात शोककळा पसरली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 − two =