You are currently viewing ‘त्यांच्या’ धमक्यांना भीक घालत नाही : नासीर काझी

‘त्यांच्या’ धमक्यांना भीक घालत नाही : नासीर काझी

वैभववाडी

विरोधकांकडून आमच्या पँनेलच्या उमेदवारांना धमकाविण्याचे प्रकार सुरू आहेत.विरोधकांच्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही.निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी आम्ही शांत आहोत. अन्यथा आम्हीही सडेतोड उत्तर देऊ.असा इशारा भाजपा तालुका अध्यक्ष नासीर काझी यांनी दिला.

भाजपा पक्ष कार्यालयात तालुका अध्यक्ष नासीर काझी यांची पत्रकार परिषद झाली.

विरोधकांकडून आमच्या उमेदवारांना धमकविण्याचे प्रकार घडत आहेत. विरोधकांच्या या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही. या धमकाविण्याना आमचे उमेदवार सडेतोड उत्तर देऊ.निवडणुकीला कुठेही गालबोट लागू नये यासाठी आम्ही शांत आहोत.जर आम्ही उत्तर दिले तर दहशत माजवली म्हणून हे विरोधक ओरड मारणार. निवडणुकीला गालबोट लागु नये म्हणून आम्ही शांत आहोत.

निवडणुकीला येतील जातील मात्र तालुक्यातील वातावरण बिघडु नये याची खबरदारी सर्व राजकीय पक्षांनी घ्यावी अस आवाहन देखील काझी यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × one =