You are currently viewing बांद्यातील जेष्ठ व्यापारी गुरुनाथ वाळके यांचे निधन…

बांद्यातील जेष्ठ व्यापारी गुरुनाथ वाळके यांचे निधन…

बांद्यातील जेष्ठ व्यापारी गुरुनाथ वाळके यांचे निधन…

बांदा

बांदा शहरातील जेष्ठ व्यापारी गुरुनाथ रामचंद्र वाळके वय.85 यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. बांदा परिसरातील सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते. बांदा शहरात सुरुवातीला त्यांनी हॉटेल व्यवसाय केला तसेच फर्निचर चा व्यवसाय केला. बांदा व्यापारी संघाचे ते बरीच वर्षे सचिव होते. श्री देव बांदेश्वर देवस्थान उपसमितीचे पाच वर्षे अध्यक्ष होते. सार्वजनिक गणेशोत्सव विठ्ठल मंदिर बांदा व सार्वजनिक नवरात्रोत्सव गांधी चौक मंडळाचे ते प्रमुख मार्गदर्शक होते.

बांदा शहरातील सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचे महत्वपूर्ण योगदान असायचे. त्यांच्या पश्चात मुलगा, सुन, विवाहित मुली, जावई, पुतणे, पुतण्या व नातवंडे असा मोठा परिवार आहे. बांदा बाजारपेठे मधील स्वीटमार्ट व कॅफेचे मालक प्रसाद वाळके यांचे ते वडील होत तर बांदा येथील व्यापारी भाऊ वाळके यांचे ते काका होत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × three =