कुडाळ (प्रतिनिधी) :
कुडाळ नगरपंचायत कार्यालयाच्या १०० मीटर परिघात २३ जानेवारी ते २४ जानेवारी पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मनाई आदेश उपविभागीय दंडाधिकारी ऐश्वर्या काळुसे यांनी लागू केला आहे.
कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष अक्षता खटावकर यांनी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली. ही निवडणूक २४ जानेवारी रोजी सकाळी ११ वा. विशेष सभा घेऊन होणार आहे. या होणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपकडून प्राजक्ता बांदेकर तर महाविकास आघाडीकडून सई काळप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. २०२२ मध्ये झालेल्या नगराध्यक्ष निवडणूकीमध्ये धमसान झाले होते. त्यावेळी नगरसेवकांसह अनेक लोकप्रतिनिधींवर गुन्हे दाखल झाले होते.
या नगराध्यक्ष निवडणूकीमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद होऊ नये त्यामुळे उपविभागीय दंडाधिकारी ऐश्वर्या काळुसे यांनी मनाई आदेश लागू केले आहेत.