You are currently viewing “शहरातील विविध साहित्य संस्थां व सामाजिक संस्था वतीने शिवाजीराव शिर्के यांना आदरांजली”

“शहरातील विविध साहित्य संस्थां व सामाजिक संस्था वतीने शिवाजीराव शिर्के यांना आदरांजली”

“शहरातील विविध साहित्य संस्थां व सामाजिक संस्था वतीने शिवाजीराव शिर्के यांना आदरांजली”

संभाजीनगर आकुर्डी  –

ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव शिर्के यांना पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने आदरांजली कार्यक्रम महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र , संभाजीनगर येथे नुकताच घेण्यात आला.
पिंपरी चिंचवड शहरातील विविध सामाजिक संस्था, साहित्य संस्था यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत आदरांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ह भ प  शामराव गायकवाड यांनी प्रवचन केले
याप्रसंगी गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा  भारतीताई चव्हाण यांनी शिवाजीराव शिर्के, हे लेखक, कवी, ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, संपादक, होते त्यांनी विविध क्षेत्रातील योगदानाची माहिती दिली आणि त्यांच्या येसूबाई या पुस्तकालाची नोंद इंडिया बुक मध्ये झालेली आहे याची माहिती सर्वांना दिली ,
यावेळी गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा डॉ.भारती चव्हाण,बंधुता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश रोकडे, कामगार नेते अरुण बोऱ्हाडे, अशोककुमार पगारिया, नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाचे अध्यक्ष राज अहेरराव, पिंपरी चिंचवड व्याख्यानमाला समन्वय  समितीचे राजेंद्र घावटे, दिलासा संस्था आणि शब्दधन काव्यमंचाचे अध्यक्ष सुरेश कंक, मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्थेचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, कलारंजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत चौगुले, वसुंधरा पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष तानाजी एकोंडे, गुणवंत कामगार राजेश हजारे, महंमद शरीफ मुलानी,उद्योजक रामदास माने, गिर्यारोहक अरविंद वाडकर, महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र उद्योग नगर केंद्रप्रमुख प्रदीप बोरसे, गुणवंत कामगार सुदाम शिंदे, शंकर आथरे, कवी सुभाष चटणे, बी आर माडगूळकर, कवी शामराव सरकाळे, मुरलीधर दळवी, हरिभक्त परायण अशोक महाराज गोरे, भरत शिंदे, महेंद्र गायकवाड, शरद काणेकर, शंकर नाणेकर,अण्णा गुरव, पांडुरंग सुतार, शिवराज शिंदे, नामदेव हुले,या सर्व मान्यवरांनी शिवाजीराव शिर्के यांच्या आठवणी सांगत आदरांजली समर्पित केली.
लेखक, कवी, ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, संपादक, सामाजिक कार्यकर्ते अशा विविध भूमिकेतून शिवाजीराव शिर्के यांनी जे योगदान दिले त्याच्या आठवणी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या.
याप्रसंगी शहरातील असंख्य गुणवंत कामगार, साहित्यिक उपस्थित होते.
हरिभक्त परायण साखरचंद लोखंडे यांनी पसायदान म्हणून आदरांजली सभेची सांगता झाली.
वृत्तांकन – अण्णा जोगदंड
९८८१२०९११९

प्रतिक्रिया व्यक्त करा