कणकवली
तालुक्यातील फोंडघाट आणि पान बाजार हे समीकरण वर्षानुवर्षे जुळले होते मात्र आता कणकवली शहरातही पान बाजार सुरू झाला आहे. शहरातील डीपी रोड लगत पान बाजाराचा शुभारंभ करण्यात आला असून कणकवली शहराबरोबरच तालुक्यातील व्यापाऱ्याची गैरसोय दूर करण्यात येणार आहे.
यावेळी हयुमन राईटचे जिल्हा अध्यक्ष संतोष नाईक, जिल्हा निरीक्षक मनोज तोरस्कर, मनसे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर,वाहतूक पोलीस विश्वजित परब,संदेश आबिटकर, आदी उपस्थित होते.