You are currently viewing आनंदीबाई रावराणे महाविद्यालयास शासनाचे सेंटर ऑफ एक्सलन्सचे प्रमाणपत्र प्राप्त

आनंदीबाई रावराणे महाविद्यालयास शासनाचे सेंटर ऑफ एक्सलन्सचे प्रमाणपत्र प्राप्त

*आनंदीबाई रावराणे महाविद्यालयास शासनाचे सेंटर ऑफ एक्सलन्सचे प्रमाणपत्र प्राप्त*

वैभववाडी

महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे आनंदीबाई रावराणे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वैभववाडी या महाविद्यालयास राज्य शासनाचे सेंटर ऑफ एक्सलन्स चे प्रमाणपत्र व एक लाख रुपये सन्माननिधी देऊन गौरविण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग तसेच महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्यावतीने करिअर कट्टा विभागाअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातून निवड झालेल्या एकूण २५ महाविद्यालयांना सेंटर ऑफ एक्सलन्सचे प्रमाणपत्र व एक लाख रुपये सन्माननिधी देऊन गौरविण्यात आले.
हा प्रमाणपत्र व निधी वितरण सोहळा महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था पुणे येथे ८ सप्टेंबर,२०२३ रोजी नामदार श्री.चंद्रकांत दादा पाटील (कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग) यांचे शुभ हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी मा. विकासचंद्र रस्तोगी IAS (प्रधान सचिव, महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग), डॉ शैलेंद्र देवळाणकर (संचालक, महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण), डॉ. विनोद मोहितकर (संचालक, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण), मा यशवंत शितोळे (अध्यक्ष, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र), महाराष्ट्र राज्यातील सर्व विभागीय सहसंचालक, महाराष्ट्रातील अनेक प्राचार्य प्रवर्तक, जिल्हा समन्वयक व इतर मान्यवर उपस्थित होते.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची पूर्ण तयारी करता यावी, यासाठी १०० विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा अभ्यासिका महाविद्यालयांमध्ये उभा करण्याचे सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्दिष्ट आहे. तसेच महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांना वेगवेगळ्या उद्योगाचे कौशल्य प्राप्त व्हावे, यासाठी सुद्धा प्रयत्न केले जाणार आहेत. सेंटर ऑफ एक्सलन्सद्वारे सुरू होत असलेल्या अनेक योजनांचा सर्व विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य तथा करिअर कट्टा सिंधुदुर्ग जिल्हा प्राचार्य प्रवर्तक डॉ. सी.एस. काकडे यांनी केले आहे.
महाविद्यालयाच्या या यशाबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातून महाविद्यालयाचे अभिनंदन होत आहे. महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी महाविद्यालयाच्या करिअर कट्टा विभागास या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

*संवाद मिडिया*

*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.

Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कॉलेज मध्ये

*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2023-2024*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*

*COLLEGE CODE-6191*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*
Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.

• Duration : 4.5 Years

*👉मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्ती.(शासन नियमानुसार).*

*पत्ता:*
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712

*संपर्क:*
📲 9145623747/ 9420156771/7887561247*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107166/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 + seven =