You are currently viewing बावशी गावात बहरला महिलांचा श्रावण रंग कार्यक्रम…

बावशी गावात बहरला महिलांचा श्रावण रंग कार्यक्रम…

बावशी गावात बहरला महिलांचा श्रावण रंग कार्यक्रम…

कणकवली

तालुक्‍यातील बावशी गावात बावशी सामाजिक प्रतिष्‍ठानच्यावतीने ‘‘श्रावण रंग” कार्यक्रम झाला. यात गावातील महिलांनी फुगडी, उखाणी, गाणी आणि लेझीम नृत्याचे बहारदार सादरीकरण केले. त्‍यानंतर ॲड.प्राजक्ता शिंदे आणि ॲड. मेघना सावंत यांनी महिलांच्या संरक्षणासाठी असलेल्‍या कायद्यांची माहिती दिली.
श्रावण रंग या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते रसिका मांडवकर, सुरेश उर्फ भाऊ रांबाडे, सेवाभावी व्यवसायिक गणेश बांदिवडेकर यांचा शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू तसेच ग्रंथ देऊन ॲड.प्राजक्ता शिंदे आणि ॲड. मेघना सावंत यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी बावशी प्रतिष्ठानचे संस्थापक कवी अजय कांडर, अध्यक्ष विलास कांडर, कार्यवाह समीर मयेकर, संजय राणे, मोहन खडपे, शिवराम गुरव, विजय कांडर, नारायण मरये, भरत कांडर, कल्पना कांडर, सुवर्णा राणे, मनीषा राणे, समीक्षा मयेकर, सरपंच मनाली गुरव ग्रामपंचायत सदस्य दिनेश कांडर,मनश्री कांडर, सौ.गावडे, प्रसिद्ध बुवा उद्धव कांडर, तंटामुक्ती माजी अध्यक्ष हेमंत कांडर, माजी सरपंच सुप्रिया रांबाडे, शिक्षक विनायक ठाकूर, दिनेश पाटील, संगीता कदम, श्रीमती सावंत आदी उपस्थित होते.
ॲड. प्राजक्ता शिंदे म्हणाल्या, शिक्षण कमी असले तरी चालेल पण महिलांना आत्मविश्वास हवा. आत्मविश्वास असेल तर कुठल्‍याही क्षेत्रात यश गाठणे अवघड नाही. गावपातळीवरच्या राजकारणापासून दूर राहून महिलांनी आपला आणि आपल्या मुलांचा विकास साधायला पाहिजे. तसेच मुलांच्या उच्च शिक्षणाला महत्त्व दिलं गेलं पाहिजे.
ॲड.मेघना सावंत म्‍हणाल्‍या, आज महिला पुरुषांच्या अत्याचाराला बळी पडत आहेत. परंतु ग्रामीण भागातील महिलांना आपल्या संरक्षणार्थ कोणता कायदा आहे याची माहिती नाही. महिलांवर अत्याचार होत असेल तर कायद्याने त्यांना संरक्षण मिळतं. मात्र यासाठी महिलांनी पुढे यायला पाहिजे. ग्रामीण भागातील महिला अजूनही घरगुती हिंसाचाराला बळी पडतात. यासाठी त्यांच्यात प्रबोधन होण्याची गरज आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश पाटील, प्रास्ताविक अजय कांडर, मनीषा राणे यांनी परिचय तर कल्‍पना कांडर यांनी आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा