You are currently viewing स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा

सावंतवाडी

आपल्यास भारतीय परंपरेनुसार चालत आलेल्या सणांपैकी गोकुळाष्टमी हा सण स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे संचालक ‘श्री. रुजुल पाटणकर’ व मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत यांचे स्वागत करण्यात आले. तसेच दीप प्रज्वलित करून व पुष्पांची आरास करून श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. इयत्ता ३ री च्या विद्यार्थीनींनी जन्माष्टमीवर आधारित गीत सादर केले. तर इयत्ता १ ली व २ री च्या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण व सुदामा यांच्या मित्रत्वाच्या नात्याची जाणीव करून देणारे नाट्य सादर केले. त्याचप्रमाणे, इयत्ता ४ थी च्या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णांच्या लिला प्रकट करणारे नृत्य सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. त्याचप्रमाणे, शाळेतील सर्व शिक्षकांनी देखील या सणाच्या निमित्ताने नृत्य सादर केले व कार्यक्रमाची शोभा वाढवली. इयत्ता ४ थी व ५ वी च्या विद्यार्थी व विद्यार्थीनींनी तीन थर रचून एकत्र मिळून दहीहंडी फोडली.यासाठी त्यांना क्रिडा शिक्षक श्री. हमीद शेख व श्री. समद शेख यांचे मार्गदर्शन लाभले. दहीहंडीचा कार्यक्रम झाल्यावर सर्वांना ‘ काल्याचा’ प्रसाद वाटण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा. शिक्षिका सौ. प्राची साळगावकर यांनी केले. या कार्यक्रमाची माहिती सहा. शिक्षिका सौ. चैताली वेर्लेकर यांनी सांगितली. श्रीकृष्णांचे स्तुतीश्लोक, भगवतगीतेमधील श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश केलेले श्लोक सहा. शिक्षिका सौ. सुषमा पालव यांनी सादर केले. तसेच, शाळेच्या समन्वयक सौ. जागृती प्रभू तेंडोलकर यांचेही कार्यक्रमाला योग्य मार्गदर्शन लाभले. शाळेच्या सहा. शिक्षिका सौ. ग्रीष्मा सावंत व कु. उमा बोयन यांनी कार्यक्रमासाठी नृत्य दिग्दर्शन केले. शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केले. इयत्ता १ ली ते ५ वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने या कार्यक्रमात आनंदाने सहभाग घेतला. या कार्यक्रमांतर्गत जातीभेद, धर्मभेद विसरून सर्वांनी मित्रत्वाचे व बंधुत्वाचे नाते जपण्याचा उद्देश सफल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवट आभार प्रदर्शनाने करण्यात आला. तसेच शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले व पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा