You are currently viewing सी. एस. एम. एस. एस. कृषि महाविद्यालय कांचनवाडी येथे “पॉवर ऑफ हॅबीट” या विषयावर व्याख्यान संपन्न

सी. एस. एम. एस. एस. कृषि महाविद्यालय कांचनवाडी येथे “पॉवर ऑफ हॅबीट” या विषयावर व्याख्यान संपन्न

छत्रपती संभाजीनगर –

छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था अंतर्गत कृषि महाविद्यालय कांचनवाडी छत्रपती संभाजीनगर येथे स्पर्धा परिक्षा मंचा मार्फत पॉवर ऑफ हॅबीट या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या विषयावर इस्कॉन संस्थेतील छत्रपती संभाजीनगर येथील अध्यात्मीक मार्गर्शक डॉ. जय हनुमान दास प्रभुजी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषि महाविद्यालयाचे संचालक डॉ. डी. के. शेळके सर होते तसेच प्रमुख उपस्थिती प्राचार्य डॉ. बैनाडे पी. एस. उप-प्राचार्य प्रा. भोंडवे ए.ए. यांची उपस्थिती लाभली. डॉ. जय हनुमान दास यांनी विद्यार्थ्यांना मार्गर्शन करत असताना चांगल्या सवयी, मनाची एकाग्रता, चांगले विचार यावर मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निराकरण केले. या कार्यक्रमासाठी विभाग प्रमुख, प्राध्यापक तसेच
मोठ्य संख्येंने विद्यार्थी यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन स्पर्धा परिक्षा मंचाचे प्रभारी अधिकारी डॉ. एस. बी. सातपुते, प्रा. पाटील पी. व्ही. आणि डॉ. दाभाडे टी. आर. यांनी केले होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. देशमुख एम.एम. तसेच आभार प्रदर्शन कु. आरती पवार यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा