You are currently viewing ….१ जानेवारीपासून लँडलाइनवरून मोबाईलवर कॉल करण्यासंदर्भातील नियमामध्ये बदल

….१ जानेवारीपासून लँडलाइनवरून मोबाईलवर कॉल करण्यासंदर्भातील नियमामध्ये बदल

येत्या १ जानेवारीपासून लँडलाइनवरून मोबाईलवर कॉल करण्यासंदर्भातील नियमामध्ये एक मोठा बदल करण्यात येणार आहे. यानुसार देशभरात लँडलाइनवरून मोबाईलवर काँल करण्यासाठी ग्राहकांना १ जानेवारीपासून मोबाईल नंबरच्या आधी शून्य (०) लावणे अनिवार्य होणार आहे. दूरसंचार विभागाने ट्रायच्या या निर्णयाला मान्यता दिली आहे. ट्रायने या प्रकारच्या कॉलसाठी मोबाईल क्रमांकाआधी शून्य लावण्याची शिफारस २९ मे २०२० रोजी केली होती.
या निर्णयामुळे दूरसंचार कंपन्यांना अधिक क्रमांक देणे सोईस्कर होणार आहे.

दूरसंचार विभागाने २० नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या एका सर्क्युलरमध्ये सांगितले की, लँडलाइनवरून मोबाईलवर नंबर डायल करण्याच्या पद्धतीत बदल करण्याच्या ट्रायच्या शिफारशीला मान्यता देण्यात आली आहे. यामुले मोबाईल आणि लँडलाइन सेवांसाठी पुरेशा प्रमाणात नंबर देण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

या सर्क्युलरमधील उल्लेखानुसार हा नियम लागू करण्यात आल्यानंतर लँडलाइनवरून मोबाईलवर कॉल करण्यासाठी मोबाईल क्रमांकाच्या आधी शून्य जोडावा लागेल. दूरसंचार विभागाने सांगितले की, दूरसंचार कंपन्यांना लँडलाइनच्या सर्व ग्राहकांना शून्य डायल करण्याची सुविधा द्यावी लागेल. सध्या ही सुविधा आपल्या क्षेत्राबाहेर कॉल करण्यासाठी उपलब्ध आहे.

फिक्स लाइन स्वीचमध्ये उपयुक्त घोषणा कराव्यात, ज्यामुळे फिक्स लाइन सबस्क्रायबर्सना सर्व फिक्स्डमधून मोबाईल कॉलच्या पुढे ० डायल करण्याच्या आवश्यकतेबाबत सांगता येईल, असेही या सर्क्युलरमध्ये सांगण्यात आले आहे.

दूरसंचार कंपन्यांना या नव्या व्यवस्थेच्या अंमलबजावणीसाठी १ जानेवारीपर्यंतचा अवधी देण्यात आला आहे. डायल करण्याच्या पद्धतीत अशा प्रकारच्या बदलामुळे दूरसंचार कंपन्यांना मोबाईल सेवेसाठी २५४.४ कोटी अतिरिक्त क्रमांक देण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. ही भविष्यातील गरजापूर्ण करण्यासाठी मदत करेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 3 =