You are currently viewing शिवसेना उद्धव गटाने मालवण कुडाळ मध्ये आपल्या पक्षाचे अस्तित्व टिकवावे, भाजपमध्ये काय चालले आहे त्यात ढवळाढवळ करू नये

शिवसेना उद्धव गटाने मालवण कुडाळ मध्ये आपल्या पक्षाचे अस्तित्व टिकवावे, भाजपमध्ये काय चालले आहे त्यात ढवळाढवळ करू नये

*मालवण कुडाळ चा आमदार हा भाजपचा असेल गुलाल ही भाजपचाच असेल*

 

*भाजप भटके विमुक्त आघाडी उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी बाळा गोसावी यांचा शिवसेना उद्धव गट मालवण तालुका अध्यक्ष हरि खोबरेकर यांच्यावर पलटवार*

 

*मालवण :-*

शिवसेना उद्धव गटाच्या मालवण तालुका अध्यक्ष खोबरेकर यांनी भाजपच्या नेत्यांवर टीका केली होती त्यांच्या टीकेला भाजप भटके विमुक्त आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी बाळा गोसावी यांनी उत्तर दिले आहे. शिवसेना उद्धव गटाच्या तालुकाध्यक्षांनी भाजपमध्ये काय चाललंय कोण कोणाविरुद्ध कुटील डाव करतो याचा शोध लावण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाचा अस्तित्व टिकवण्यासाठी काम करावं. सध्या माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्ष प्रवेश मोठ्या जोरात चालू असल्यामुळे खोबरेकरांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच खोबरेकर मालवण मध्ये सैरभर झाले असावेत. त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची चिंता करू नये. २०२४ ला भाजपचा आमदार निवडून येणार आणि भाजपच गुलाब उधळणार यात तीळ मात्र शंका नाही असा पलटवार गोसावी यांनी खोबरेकरांवरती केला आहे.

मालवण कुडाळ मध्ये विकास झाला असे खोबरेकर म्हणाले मग या विधानसभा मतदारसंघातील धनगर वस्त्या अजूनही का विकसित झाल्या नाहीत, अजून त्यांच्या वाडी वस्तीवर रस्ते पोचले नाहीत, मेल्यानंतर जाळण्यासाठी स्मशानभूमी देखील काही ठिकाणी मिळाली नाहीत, अजून त्यांना दैनंदिन जीवनामध्ये अडचणींचा सामना करावा लागतो. साडेसात वर्ष सत्तेतील आमदार असून सुद्धा विद्यमान आमदार मालवण तालुक्याचा विकास करण्यास निष्क्रिय ठरलेले आहेत. त्यामुळे निश्चितपणाने यावेळी अमुलाग्र बदल होऊन भाजपचाच आमदार निवडून येईल. त्यामुळे शिवसेना उद्धव गटाच्या तालुका अध्यक्षांनी आपला पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावेत. भाजपमध्ये काय चाललय त्या ठिकाणी डोकावून पाहू नये. पुन्हा आमच्या नेत्यांवरती टीका केल्यास जशास तसे उत्तर देऊ असा थेट इशाराही बाळा गोसावी यांनी खोबरेकरांना दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा