You are currently viewing सवलतीच्या दरात एलईडी टीव्ही आणि सायकलचे वितरण

सवलतीच्या दरात एलईडी टीव्ही आणि सायकलचे वितरण

भाजप नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून उपक्रम ; प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांच्या हस्ते मालवण येथे शुभारंभ

मालवण 

भाजपा कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मालवण शहर भाजप कार्यालय येथे ५० टक्के सवलतीच्या दरात एलईडी टीव्ही आणि सायकल वितरण केले जात आहे. १० सप्टेंबर पर्यत सुरू असणाऱ्या या उपक्रमाचा शुभारंभ शुक्रवारी भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.


निलेश राणे यांच्या माध्यमातून नेहमीच जनतेचे हित लक्षात घेऊन अधिकाधिक स्वरूपात उपक्रम राबवले जातात. त्याच धर्तीवर हा उपक्रम असून जनतेने याचा लाभ घ्यावा. असे आवाहन माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, प्रदेश सदस्य दत्ता सामंत यांनी केले आहे. सुदेश आचरेकर यांनी सविस्तरपणे या उपक्रमाची माहिती उपस्थितांना दिली.

यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर यांसह माजी सभापती सुनील घाडीगांवकर, खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गावकर, माजी नगरसेवक आप्पा लुडबे, गणेश कुशे, जगदीश गांवकर, संचालक आबा हडकर, भाजप महिला तालुकाध्यक्ष पूजा करलकर, ओबीसी महिला मोर्चा तालुकाध्यक्ष पूजा वेरलकर, शहर अध्यक्ष चारुशीला आचरेकर, माजी नगरसेविका ममता वराडकर, पूजा सरकारे, राणी पराडकर, महिमा मयेकर, दिव्या कोचरेकर, महानंदा खानोलकर, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष महेश सारंग, पंकज पेडणेकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विक्रांत नाईक, मंदार लुडबे, शहर अध्यक्ष ललित चव्हाण, बंड्या पराडकर, विलास मुणगेकर, प्रमोद करलकर, मोहन वराडकर, दत्तात्रय केळुसकर, राजू बिडये, निनाद बादेकर, राज कांदळकर, राजा मांजरेकर, वसंत गांवकर, कमलाकर कोचरेकर, प्रशांत बिरमोळे, बाबू कासवकर, ओंकार लुडबे, यशवंत मालंडकर यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. शुभारंभाला नाव नोंदणीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यावेळी दत्ता सामंत यांनी शुभरंभाची सायकल नोंदणी करून यशा मालंडकर यांना ती सायकल भेट दिली.

नाव नोंदणीसाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. मात्र १० सप्टेंबर पर्यत हा उपक्रम सुरू राहणार आहे. नाव नोंदणी करणाऱ्या प्रत्येकाला सवलतीच्या दरात नोंदणी केलेली वस्तू मिळणार असल्याची माहिती माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा