You are currently viewing मराठी भूताखेतांच्या गोष्टी

मराठी भूताखेतांच्या गोष्टी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम कथा*

 

*मराठी भूताखेतांच्या गोष्टी*

 

(क्रमांक ४….)

 

खुप वर्ष्यापूर्वीची गोष्ट आहे . रत्नागिरी कुडाळ या आपल्या सासरहून एक गर्भवती झालेली माहेरवाशीण साताऱ्यात आपल्या आईवडिलांच्या कड़े बाळंतपणासाठी आली होती .. त्यावेळी आजच्या सारखी सक्तिची बेडरेस्ट वगैरे अशी प्रथा नव्हती .उलट गर्भवती बाईने प्रसूती सुलभ व्हावी म्हणून मुद्दामच काही कामे करावित ,रोज फिरावे , दळण दळावे , धुणे धुवावे , व्यायाम करावा अशी प्रथा होती , शिकवण होती …तसेच तिन्हीसांजेला किंवा आमावास्या , पौर्णिमा यादिवशी बाहेर जावू नये , गावाची वेस ओलांडु नये …कुणी मयत वगैरे झाले तर तेथे शिवू (स्पर्श) नये ..लांब उभे रहावे …स्मशानात जावू नये ..इत्यादी अनेक रूढी प्रथा होत्या ..थोडक्यात गर्भावस्थेत शक्यतो शुचिर्भूत रहावे ..याचे कारण एवढेच की होणारे संतान ( मूल) हे छान व्हावे हेच होते …

कालांतराने ती गर्भवती प्रसूतही झाली , मूल (मुलगा) झाला . सर्वांनाच खुप आनंद झाला .. सासरकडील सर्व मंडळीही आली मुलाचे बारसे झाले सर्वत्र आनंदी आनंद होता …पण पुढे पुढे ती बाळंत झालेली मुलगी दिवसेंदिवस खंगत चालली , अशक्त होत चालली होती ..घरातील सर्वांना तिची काळजी वाटू लागली , …पण ती मुलगी काहीच सांगत नव्हती ..त्याचे कारण म्हणजे ती खुप भ्याली होती . तिच्या पोटी एका पिशाच्यच जन्माला आले होते . ते नेहमी इतरा समोर लहान गोंड़स , हसरे ,नाजुक बाळासारखे दिसत असे ..पण ते त्याच्या आईजवळ एकटे ( एकांतात) असले स्तनपान करीत असले की मोठ्ठे होत असे ..पाळण्यात जरी असले तरी पिशाच्या सारखे चाळे करीत असे .पाळणयातून कधी हात तर कधी पाय लांब करीत असे . कधी घराच्या आढयाला ( तूळईला) पाय ऊंच करून लावत असे ..असे अनेक विचित्र वेडे वाकड़े चाळे करीत असे आणी ते फक्त त्याच्याच आईला ( बाळंत झालेल्या मुलीलाच ) दिसत असे . बाळंतीणीच्या खोलीत कुणी आले की त्या सर्वांना ते अगदी नार्मल छोट्या बाळा सारखे दिसत असे. त्यामुळे ही गोष्ट कुणाला सांगून देखील पटत नव्हती ,कुणाचा विश्वास बसत नव्हता …हे त्या मूलीचे दुर्दैव होते ….प्रारब्ध योगाने पूर्वजन्मिचे येणे वसूल करण्यासाठी की काय त्या पिशाच्याने तिच्या पोटी जन्म घेतला होता असेच म्हणावे लागते .कारण एक दिवस ते मूल स्वत:ची दुपटी , कपड़े , खेळणी , अन्य गोष्टी एका गठुड्यात बांधून स्वतःच्या छातीला घट्ट पकडुन त्याच बाळंतीणीच्या खोलीत एका कोपऱ्यात मरून पडले होते …ते पाहिल्यावरच घरातील सर्वांनाच त्या मुलीला झालेल्या त्रासाची कल्पना आली …. ही मी ऐकलेली साताऱ्या तालुक्यातील एका खेडेगावातील सत्य घटना आहे ….

 

*© वि.ग.सातपुते.(विगसा)*

👍👍👍👍🙏

 

*संवाद मिडिया*

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण (Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

*Advt Link👇*

————————————————–

📝 *प्रवेश सुरु!* *प्रवेश सुरु!*📝

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण ( Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

👉 Ju Kg ते आठवी वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी जेवण 🍛व क्लासची एकत्रित सुविधा 📚👩🏻‍💻

 

(होमवर्क तसेच Grammer इत्यादीचा परिपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट)📑

 

👉 TV, Mobile यापासून दूर ठेऊन मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेशीत

 

⏰ *वेळ: सकाळी 10 ते 5:30 पर्यंत*

 

👉 (मिलाग्रीस हायस्कूल मधील मुलांना पिकअप करण्याची सोय आहे)

 

*पत्ता:* बाबा फर्नांडिस F – 122, बांदेकर मेस समोर, मिलाग्रीस हायस्कूल नजिक, सालईवाडा, सावंतवाडी

 

📱 *संपर्क:*

सौ.सरोज राऊळ मो.नं: 8983757132

सौ.सुरेखा बोंद्रे मो. नं: 8975257453

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × one =