You are currently viewing वन विभागाकडून आंबोलीत निसर्ग पर्यटनाला मंजुरी – आंबोली सरपंच सौ. सावित्री पालेकर

वन विभागाकडून आंबोलीत निसर्ग पर्यटनाला मंजुरी – आंबोली सरपंच सौ. सावित्री पालेकर

सावंतवाडी:

 

गेल्या काही वर्षांपासून वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेली आंबोली ‘निसर्ग पर्यटनासाठी’ ही नावारूपास येत आहे. त्यामुळे आंबोली परिसरात निसर्ग पर्यटनासाठी रीतसर परवानगी मिळावी यासाठी निसर्ग अभ्यासक गेली बरीच वर्षे प्रयत्न करत होते. त्यांच्या प्रयत्नांचा सकारात्मक विचार करून संयुक्त वन व्यवस्थापन समिती आंबोलीच्या माध्यमातून वन विभाग सावंतवाडी यांच्याकडे परवानगीची मागणी करण्यात आली व सर्वांच्या प्रयत्नांना अखेर यश आले.

आंबोली परिसरात आढळणारे वेगवेगळ्या प्रजातीचे साप, बेडूक, मासे, फुलपाखरू व इतर कीटक व वनस्पती हे वाइल्ड लाईफ छायाचित्रकरांसाठी व निसर्ग अभ्यासाकांसाठी व संशोधकांसाठी एक नविन डेस्टिनेशन बनत चालले आहे.

आंबोलीत काही युवकांना वन विभागाच्या सहायाने प्रशिक्षण देण्यात आले होते,त्या युवकांच्या उपस्थितीत नितसर नोंदणी करून निर्धारित वेळेसाठी निसर्ग पर्यटनसाठी परवानगी देण्यात आली आहे.

निसर्ग पर्यटन करताना वन विभागाने दिलेल्या सर्व अटी व शर्ती चे सर्वांनी काटेकोर पणे पालन करायचे आहे व मिळालेल्या संधीचे सोने करावे, अशी अपेक्षा आंबोली सरपंच सौ. सावित्री पालेकर व संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − twelve =