You are currently viewing राष्ट्रकुट आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक यांच्यातर्फे आगळीवेगळी कोलू स्पर्धा संपन्न

राष्ट्रकुट आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक यांच्यातर्फे आगळीवेगळी कोलू स्पर्धा संपन्न

*राष्ट्रकुट आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक यांच्यातर्फे आगळीवेगळी कोलू स्पर्धा संपन्न*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

सावरकरांनी अंदमानच्या तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा भोगली तेव्हा त्यांना तब्बल दहा वर्षांसाठी कोलू फिरवण्याची अमानवी शिक्षा सुद्धा करण्यात आली होती. देशाला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी, भारतमातेला इंग्रजांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी त्यांनी भोगलेली शिक्षा ही फार भयावह आणि प्रचंड हालअपेष्टांची होती.

आजही या शिक्षेची साधी कल्पनासुद्धा आपल्याला करवत नाही. पण त्याची अनुभूती आजच्या पिढीला देण्यासाठी, त्या हालअपेष्टांची जाणीव करून देण्यासाठी राष्ट्रकुट मासिक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक १९ ऑगस्ट व रविवार दिनांक २० ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथे कोलू स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

शनिवार दिनांक १९ ऑगस्ट रोजी सदर स्पर्धेचे उद्घाटन झाले. त्याप्रसंगी उद्घाटक म्हणून महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष हेमचंद्र पाटील, तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे उपस्थित होते. त्यांच्यासोबत राष्ट्रकुटचे प्रकाशक, संपादक प्रकाश ओहळे, कार्यकारी संपादक राजन देसाई, उपसंपादक (समाज माध्याम) महेश कुलकर्णी, सहसंपादक राहुल येल्लापुरकर, छायाचित्रकार अनिल पानस्कर, रिहॅब पॉइंटचे संचालक उमेश शेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या प्रसाराची जबाबदारी आचार्य ९० एफएम यांनी चोखपणेपार पाडली. आदित्य मंदार खरे या आठवी इयत्तेतील विद्यार्थ्याने उद्घाटन झाल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील कविता सादर करून वातावरण भारावून टाकले.

सदर स्पर्धेचे काटेकोर परीक्षण श्रीकांत घाटे यांनी केले. या स्पर्धेत विविध वयोगटांतल्या तब्बल २५० पेक्षा अधिक सावरकरप्रेमींनी सहभाग नोंदवला. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, कोल्हापूर, पुणे, जळगाव या महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमधून स्पर्धकांनी सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वी केली. मलेशिया येथून भारत दर्शनार्थ आलेले प्रवासीही कुतूहलापोटी स्पर्धेत सामिल झाले.

सदर स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ रविवार दिनांक २० ऑगस्ट रोजी पार पडला. सदर स्पर्धेत डॉ. राहुल भांडारकर यांनी प्रथम, विवेक पाटील यांनी द्वितीय आणि सई कुलकर्णी यांनी तृतीय क्रमांक पटकावला. यांच्यासोबतच ओम शिंपी व जयमाला पवार यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला.

सदर स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी स्मारकाचे पदाधिकारी रणजित सावरकर, राजेंद्र वराडकर, कल्पना ओहळे, मृणाल कुलकर्णी यांच्यासोबतच स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे सहकारीवृंद आणि राष्ट्रकुट मासिकाच्या सहकारीवृंद आणि सावरकर आय.ए.एस. स्टडी सर्कलचे विद्यार्थी यांनी अथक परीश्रम घेतले. याबरोबरच कोकण ॲग्रो फार्म लि., बम बम भोले यात्रा कंपनी, रिहॕब टिम आॕफ इंडीया, अनिल वेलणकर, गुरूदत्त वाकदेकर, संजय कचरे, शोभाताई गुलाणे आणि विश्वास थत्ते यांचे मोलाचे सहाय्य लाभले.

*संवाद मिडिया*

*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.

Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कॉलेज मध्ये

*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2023-2024*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*COLLEGE CODE-6191*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*

Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.

*• Duration : 4.5 Years&

*पत्ता:*
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712

संपर्क:
*📲 9145623747/ 9420156771/7887561247*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107166/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा