You are currently viewing दोडामार्गात दुषित पाण्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका; राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा

दोडामार्गात दुषित पाण्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका; राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा

दोडामार्ग

दोडामार्ग शहरात नळयोजनेद्वारे मणेरी येथील विहीरीतून दूषीत व गढूळ पाणी येत असल्याने नागरीकांच्या जिवीतास धोका उद्भवत आहे. त्यामुळे शहरवासीयांना शुध्द व निर्जंतूक पाणीपुरवठा करावा अन्यथा शहरवासीयांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे नगरपंचायत प्रशासना विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुदेश तुळस्कर यांनी दिला आहे. या संदर्भात एक निवेदनही त्यांनी नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांना दिले.

मणेरी येथील विहीरीतूनकसई – दोडामार्ग नगरपंचायतच्या माध्यमातून नागरीकांना नळयोजनेव्दारे पाणी पुरवठा केला जातो. तिलारी नदीचे पाणी थेट पाईपव्दारे विहीरीतून नळयोजनेत येते. त्याचे शुध्दीकरण होत नाही. त्यामूळे गेल्या काही महीन्यांपासून हे पाणी गढूळ स्वरूपात येत आहे. जे आंघोळीसाठी व पिण्यासाठी वापर करण्याच्याही योग्यतेचे नाही. तसेच येथील नागरीकांना या पाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. त्यामुळे नाईलास्तव म्हणून या पाण्याचा वापर करावा लागतो. याबाबत नगरपंचायतीला अनेकवेळा कल्पना दिलेली आहे. तोंडी स्वरूपात चर्चाही झालेली आहे. परंतू यावर कोणतीही उपाययोजना झालेली नाही तसेच नगरपंचायत प्रशासन गंभीर दिसत नाही. सततच्या येणा-या या गढूळ पाण्याने नागरीकांच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून लवकरच गणेशचतुर्थी हा मोठा सण जवळ येत आहे. या दुषित पाण्यामुळे वेगवेगळ्या साथीचे आजार मोठया प्रमाणात पसरून नागरीकांच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे. भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडल्यास याला केवळ नगरपंचायतच जबाबदार राहील. त्यामूळे आपणांस विनंती आहे की या सर्वाची आपण पहाणी करून लवकरात लवकर शहरवासीयांना शुध्द व निर्जंतूक पाणीपुरवठा सुरळीत करावा अन्यथा शहरवासीयांच्या हितासाठी शुध्द पाण्यासाठी जनआंदोलन करावे लागेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे देण्यात आला आहे. यावेळी तालुकाध्यक्ष प्रदीप चांदेलकर, उपजिल्हाप्रमुख प्रा. संदीप गवस, उल्हास नाईक, बाळा कोरगावकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा