You are currently viewing साळशी येथील इनामदार श्री देव सिद्धेश्वर देवालयाचा शनिवार ११ मे रोजी वर्धापनदिन दिन सोहळा

साळशी येथील इनामदार श्री देव सिद्धेश्वर देवालयाचा शनिवार ११ मे रोजी वर्धापनदिन दिन सोहळा

साळशी येथील इनामदार श्री देव सिद्धेश्वर देवालयाचा शनिवार ११ मे रोजी वर्धापनदिन दिन सोहळा

विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

देवगड

देवगड तालुक्यातील चौ-यांऐंशी खेड्यांचा अधिपती व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या इनामदार श्री देव सिद्धेश्वर देवालयाचा शनिवार ११ मे रोजी वर्धापनदिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे.यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ८ वाजता इनामदार श्री देव सिद्धेश्वर व श्री देवी पावणाई देवालयात लघुरुद्र व बारा स्थळातील देव- देवतांवर अभिषेक , दुपारी १२ वाजता महाआरती, दुपारी १ वाजता महाप्रसाद, दुपारी ३ वाजता श्री सत्यनारायणाची महापुजा, सायंकाळी ५ वाजता तीर्थप्रसाद, रात्री ८ वाजता स्थानिक सुस्वर भजने, रात्री १० वाजता श्री विघ्नहर्ता रामेश्वर दशावतार नाट्यमंडळ निगुडे( सावंतवाडी) यांचा ‘शिव अघोरी संग्राम’ हा पौराणिक नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे.

तरी सर्व भाविकांनी उपस्थित राहून तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा.असे श्री देव सिद्धेश्वर पावणाई इनाम देवस्थान ट्रस्ट साळशी, बारा-पाच मानकरी व ग्रामस्थ मंडळीनी कळविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा