You are currently viewing सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनने सर्वात भव्य पौराणिक मालिका ‘श्रीमद रामायण’ची केली घोषणा

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनने सर्वात भव्य पौराणिक मालिका ‘श्रीमद रामायण’ची केली घोषणा

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

आजच्या काळातही प्रासंगिक ठरणारी मूल्ये, तत्वे आणि आयुष्यभरची शिकवण देणाऱ्या प्राचीन आध्यात्मिक युगात भारतीय कुटुंबांना घेऊन जात सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन प्रभू श्रीरामाची महागाथा ‘श्रीमद रामायण’ अस्सल व सर्वात शुद्ध रूपात साकारण्याची घोषणा केली आहे.

स्वस्तिक प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेली ही सर्वात भव्य पौराणिक मालिका जानेवारी 2024 मध्ये छोट्या पडद्यावर अवतरणार आहे.

*मालिकेचा टीझर येथे पाहा* : https://www.instagram.com/reel/Cv7mUXProsD/?igshid=MzRlODBiNWFlZA==

 

‘श्रीमद रामायण’ येतेय, फक्त सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर

प्रतिक्रिया व्यक्त करा