You are currently viewing अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन सोहळा

अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन सोहळा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री ज्योत्स्ना तानवडे लिखित अप्रतिम लेख*

 

*( अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन सोहळा )*

 

*” क्षण अमृताचे “*

 

 

पारतंत्र्याच्या बेड्या तुटल्या श्वास झाले मोकळे

तिरंगा फडके आकाशात मातृभूमीला स्वातंत्र्य मिळाले ||

 

१५ ऑगस्ट १९४७ ला समस्त भारतवासीयांनी स्वतंत्रभूमीत मुक्त श्वास घेतला. या गोष्टीला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. आज अनेक टप्पे पार करीत देशाने अतिशय उज्वल अशी अमृतमहोत्सवी वाटचाल पूर्ण केलेली आहे.

आपल्या देशाला अध्यात्मिक, बौद्धिक, वैचारिक अशी भक्कम बैठक लाभलेली आहे. या पक्क्या पायावर प्रगतीचा आलेख चढतच गेला आहे. आधुनिक तंत्रज्ञान, शिक्षण, विज्ञान, वैद्यकशास्त्र, संरक्षण शास्त्र, दळणवळण अशा कितीतरी क्षेत्रात देशाने प्रगतीची नवीन नवीन शिखरे गाठलेली आहेत‌.

आत्ताच्या ‘कोविड १९’ च्या महामारीवर यशस्वी मात करणे हे तर देशाचे अभूतपूर्व यश आहे. जगाच्या इतर देशांमधील, अगदी प्रगत देशांमधील सुध्दा, परिस्थिती पाहिल्यावर आपली कामगिरी अतिशय कौतुकास्पद आणि अभिमानाची आहे. जगण्याच्या प्रत्येक स्तरावर प्रचंड विभिन्नता असणाऱ्या एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या आपल्या देशाने जिद्द, प्रामाणिक प्रयत्न आणि धैर्याने सामूहिकरित्या या संकटाचा यशस्वी प्रतिकार केला आहे.

देशाच्या प्रगतीला असंख्यांचे कर्तृत्व, प्रयत्न कारणीभूत आहेत. पण प्रत्येकानेच त्यासाठी आपले योगदान दिले पाहिजे. देशाकडून प्रत्येकाला खूप गोष्टींची अपेक्षा असते. ती रास्तच आहे. या अपेक्षा पूर्ण व्हायलाही हव्यात. पण याच जोडीने जबाबदार नागरिक म्हणून आपलीही काही कर्तव्ये असतात याचे सदैव भान हवे हेही तितकेच खरे आहे. आपले मूलभूत हक्क, अधिकार याबाबत जागरूक, आग्रही असतानाच आपल्या जबाबदाऱ्या, कर्तव्ये पार पाडण्यासाठी पुढे आले पाहिजे. ‘आपले घर’ म्हटले की त्याचे रक्षण करणे, हीत जपणे हे आपण जेवढ्या प्राधान्याने, आत्मीयतेने करतो तीच भावना देशासंदर्भातही असायला हवी. देशहिताचा विचार सदैव जागृत हवा.

कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार, लाच देणे-घेणे, हिंसाचार, स्त्री अत्याचार, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान असे कोणतेही कृत्य आपल्या हातून घडू नये याची जबाबदारी ही प्रत्येकाचीच आहे. ‘मला काय त्याचे’ ही वृत्ती पूर्णपणे सोडून देऊन देशहीत सदैव जपलेच पाहिजे.

देशात ‘सुशासन’ हवे यासाठी असंख्य कायदे आहेत. पण नुसते कायदे करून चालत नाही तर ते कायदे पाळण्याचा सर्वांचा निर्धार पक्का हवा असतो. प्रत्येकाने मनाने हे बंधन मान्य केले पाहिजे. समजा, बैलगाडीच्या दोन बैलांनी वेगवेगळ्या दिशांना जायचा विचार केला तर ती गाडी नीटपणे पुढे जाईल का ? उलटी – पालटी होईल ना ! म्हणूनच त्यांच्या मानेवर ‘जू’ असते जे त्यांना विलग होऊ देत नाही. कायदा या ‘जू’ सारखाच असतो. तरीही चुकारपणा झालाच तर नाकात वेसण आणि चाबूक असतोच. ही शिक्षा बरोबर मार्गी लावते. समाजशकट निर्विघ्नपणे हाकायचा तर सर्वांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी कायदे हवेत. ते मोडणाऱ्यांना शिक्षा ही हवीच. तरच इतरांच्या हक्काचे रक्षण होईल.

आजकाल परदेशी पर्यटन वाढले आहे. चांगलीच गोष्ट आहे. जग बघायला मिळते. पण तिकडे जाऊन आल्यावर तिथली स्वच्छता, शिस्तपालन, नियम यांची मुक्तपणे स्तुती करत आपल्याकडे कशी घाण, बेशिस्त वगैरे आहे असे म्हणत अधिकारवाणीने ताशेरे मारायची फॅशनच झाली आहे. पण तिथे हे नियम कोण पाळतात ? तिथले नागरिकच ना ? आपणही तिथे असेपर्यंत दंड होतो हे लक्षात ठेऊन कचरा, चॉकलेटचे कागद जपून पर्समध्येच ठेवतो. पण आपल्या देशात परत आल्यावर मात्र रस्त्यात कचरा टाकायला, थुंकायला सुरुवात होते. मग आपले कायदे, शिस्त पाळायची जबाबदारी कोणाची ? ही परिस्थिती सुधारणे आपल्याच हातात आहे ना ! हेच सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.

कायदा म्हणजे आपल्यासाठी आपल्या हातात असणारी आपल्या आरोग्याची, विकासाची, प्रगतीची गुरुकिल्लीच आहे. फक्त अगदी मनापासून प्रामाणिकपणे प्रत्येकानेच हे नियम पाळायला पाहिजेत.

 

देशापुढे अनेक प्रश्न आहेत, अडचणी आहेत, धोके आहेत. ते कुणा एकाचे नसून आपणास सर्वांचेच आहेत. सर्व गोष्टींचे नफा नुकसान हे सर्वांचेच असते. तेव्हा देशाला प्रगतीपथावर असेच पुढे पुढे नेणे ही आपलीच जबाबदारी आहे. कारण देशात कुशल तंत्रज्ञ आहेत, अतिशय बुद्धिमान तरुणाई आहे. त्यांच्या सहाय्याने देशाची योजनाबद्ध प्रगती करणे हे निश्चितपणे आपल्या हातात आहे. म्हणूनच सरकार, प्रशासन आणि नागरिक यांच्या सुयोग्य, संतुलित समन्वयाची वज्रमूठ बांधली गेली तर अत्युच्च प्रगतीचा हा गोवर्धन उचलणे सहज शक्य होणार आहे. त्यातूनच स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करून शतक महोत्सवी वाटचाल करताना देश पुन्हा वैभवाच्या शिखरावर पोहचण्याचे स्वप्न सत्यात येणे शक्य आहे.

जन्म लाभला पवित्र देशी भाग्य आपुले हे अविनाशी

तिच्या प्रगतीचे होऊ भोई यश पताका नेऊ आकाशी |

 

ज्योत्स्ना तानवडे.

वारजे, पुणे ५८

 

 

*संवाद मिडिया*

 

*रक्त तपासणी व स्ट्रेस टेस्ट*

 

*~4050~ ची तपासणी फक्त 899 मध्ये*

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————–

*हृदयरोग, मधुमेह, ब्लडप्रेशर, हाय कोलेस्ट्रॉल, ब्लॉकेजेस, मानसिक ताणतणाव, लठ्ठपणा, अँजिओग्राफी, अॅन्जिओप्लास्टी, आणि बायपास केलेल्या रुग्णांसाठी*

 

*रक्त तपासणी व स्ट्रेस टेस्ट*

*~4050~ ची तपासणी फक्त 899 मध्ये*

 

*रविवार दि. 20 ऑगस्ट 2023 वेळ : स. 8 ते स. 11.00 वा.*

 

*खालील रक्त तपासण्या केल्या जातील*

 

*डायबेटिस* *(Diabetes Profile)HbA1C*

 

*कोलेस्ट्रॉल (Lipid Profile)*

 

*किडनी(Kidney Function Test)*

 

*लिव्हर (Liver Function Test)*

 

*थायरॉईड (Thyroid Stimulating Hormone) ( TSH)*

 

*स्ट्रेस टेस्ट तपासणी*

 

*स्ट्रेस टेस्ट हे एक गोल्ड स्टँडर्ड इन्वेस्टिगेशन आहे. आणि* *तुमच्या हृदयाची कार्यक्षमता लक्षात येते. हृदयाला रक्त पुरवठा सुरळीत चालू आहे की नाही हे लक्षात येते. हृदयाचा रक्तपुरवठा ब्लॉकेज सारख्या त्रासाने अडत असल्यास ते तपासणीमध्ये कळते*

 

*टिप- उपाशी पोटी सॅम्पल देणे आवश्यक आहे. नाव नोंदणी आवश्यक*

 

*नाव नोंदणी आवश्यक माधवबागच्या खालील शाखेशी संपर्क साधा*

 

*कणकवली – 9373183888*

 

*कुडाळ – 9011328581*

 

*सावंतवाडी – 7774028185*

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा